Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 वर्षांपासूनचं प्रेम, मोठमोठी स्वप्न बघितली, कोरोनाने पाणी फेरलं, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, देश हळहळला

मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे (Madhya Pradesh woman commits suicide after her husband death due to corona).

18 वर्षांपासूनचं प्रेम, मोठमोठी स्वप्न बघितली, कोरोनाने पाणी फेरलं, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, देश हळहळला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 6:19 PM

भोपाळ : मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीचं कोरोनामुळे निधन झालं म्हणून पत्नीने देखील आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. संबंधित घटना ही इंदौर शहरातील राजेंद्र नगर येथील सेंच्युरी पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव नेहा पंवार असं आहे. तर तिच्या मृतक पतीचं नाव पवन पंवार असं आहे. नेहाने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी स्वत:चं आयुष्य संपवलं. तर तिचा पती पवनचंही अवघ्या 36 व्या वर्षी निधन झालं. महाभयंकर कोरोना विषाणूमुळे तरुण दाम्पत्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे (Madhya Pradesh woman commits suicide after her husband death due to corona).

पाच वर्षांपूर्वी लग्न

नेहा आणि पवन गेल्या अठरा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी लग्न करुन आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. दोघांनी खूप मेहनत करुन मोठ्या पदावर पोहोचायचं, असं स्वप्न पाहिलं होतं. दोघांनी एकमेकांच्या मदतीने पाच वर्षात बरंच काही मिळवलं देखील. मात्र, नियतीने वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. नेहा एका महाविद्यालयात प्रोफेसर पदावरती नोकरी करु लागली. तर तिचा पती हा नुकताच पीएससीची परीक्षा पास झाला होता. त्याची रेंजरच्या पदासाठी निवड झाली होती. पण कोरोना संकटामुळे त्याची नियुक्ती रखडली होती. येत्या काही दिवसांमध्ये तो कामावर रुजू होणार होता. मात्र, 19 एप्रलिला त्याला कोरोनाने जडले.

पवनचा उपचारादरम्यान मृत्यू

पवन याच्यावर भंवरकुआ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सलग सात-आठ दिवसांच्या उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. पवनच्या मृत्यूची बातमी कळताच नेहाच्या पायाखालची जमीन कोसळली. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. स्वत:चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतके दिवस खसता खाल्यावर, पतीसोबत जीवन-मरणाची शपथ घेतली. मात्र, संसाराच्या अर्ध्या वाटेवरच पतीच्या जाण्याने ती आतून पूर्णपणे खचली. तिने या कठीण काळात इतक्या दिवसांपासून राखलेला संयम सोडला आणि स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

नेहानेही आयुष्य संपवलं

पवनच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक बडवानी येथून तर नेहाचे नातेवाईक बिलासपूर येथून इंदौरला दाखल झाले. पवनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला बडवानी येथे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली होती. त्यावेळी नेहा कपडे घेऊन येते, असं सांगून सेच्यूरी पार्कातील तिच्या घरी गेली. पतीच्या जाण्याच्या दु:खात तिने स्वत:ला देखील संपवण्याचा निर्णय घेतला. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली (Madhya Pradesh woman commits suicide after her husband death due to corona).

हेही वाचा : कोरोनाने वडील गेले, तीन काकाही वारले, डॉक्टर तरुणीचा आरोग्यसेवेचा वसा कायम

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.