AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीला पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिक घाबरले

राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 2.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. (Magnitude-2.3 earthquake hits Delhi's Nangloi)

दिल्लीला पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिक घाबरले
| Updated on: Dec 25, 2020 | 7:00 AM
Share

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 2.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. दिल्लीच्या नांगलोई येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले. साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोक घराबाहेर पडले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Magnitude-2.3 earthquake hits Delhi’s Nangloi)

आज पहाटे 5 वाजून 2 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 5 किलोमीटर आत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोक साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने अचानक जाग झालेल्या लोकांच्या मनात धस्स झालं. जमीन हालत असल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ घराबाहेर पळ काढला. त्यानंतर काहीवेळ घराबाहेरच वेळ घालवल्यानंतर कोणताही धोका नसल्याची जाणीव झाल्यानंतरच त्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, भूकंपाचे झटके कधीही बसण्याची भीती मनात निर्माण झाल्याने अनेकांनी जागरण करण्यावरच भर दिला. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केलं आहे.

फिलिपाईन्समध्येही भूकंप

फिलिपाईन्सची राजधानी मनीला येथेही आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मनाली येथील भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. मनालीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, येथील जीवित वा वित्तहानीची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

भूकंप का येतात?

पृथ्वीच्या पोटात 7 प्लेट्स असतात. त्या निरंतर फिरत असतात. या प्लेट्स ज्या ठिकाणी टक्कर देतात त्याला फॉल्ट लाईन झोन म्हटलं जातं. वारंवार टक्कर दिल्याने या प्लेट्सचे कोनही फिरतात. अधिक दबाव आल्याने या प्लेट्स तुटूही लागतात. या प्लेट्स तुटू लागल्यावर त्यातील ऊर्जा बाहेर येण्यासाठी रस्ता शोधत असते. याच डिस्टर्बन्स नंतर भूकंप येत असतो. (Magnitude-2.3 earthquake hits Delhi’s Nangloi)

संबंधित बातम्या:

कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

Live | दिल्लीत पहाटे भूकंपाचे झटके, 2.3 रिश्टर स्केल तीव्रता

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, घरांना तडे

(Magnitude-2.3 earthquake hits Delhi’s Nangloi)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.