महाकुंभमेळ्यात नावाडी कुटुंबाने कमावले ₹30 कोटी, पण या संस्थेने छापले ₹200 कोटी
Railway Kumbh Mela Income: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नावाडी कुटुंबाची यशोगाथा सांगितली. त्या कुंटुंबाने 45 दिवसांत तब्बल 30 कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. आता महाकुंभाचा लाभ आणखी एका संस्थेला मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

Maha Kumbh 2025: प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक विक्रम झाले. या महाकुंभात 65 कोटी पेक्षा जास्त भाविकांनी डुबकी मारली. उत्तर प्रदेश सरकारला तीन लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभात स्नान केले. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नावाडी कुटुंबाची यशोगाथा सांगितली. त्या कुंटुंबाने 45 दिवसांत तब्बल 30 कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. आता महाकुंभाचा लाभ आणखी एका संस्थेला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ही संस्था म्हणजे भारतीय रेल्वे आहे. रेल्वेला 200 कोटी रुपयांची कमाई कुंभमेळ्यातून झाली आहे.
महाकुंभाचा लाभ सरकार आणि मोठ्या कंपन्यांना चांगलाच झाला. उत्तर मध्य रेल्वेने महाकुंभात चांगली कमाई केली. या काळात पाच कोटी नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. त्यातून 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातून 29 कोटींची कमाई झाली होती. परंतु सन 2025 मध्ये रेल्वेची कामगिरी चांगली राहिली.
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, महाकुंभ दरम्यान कोट्यवधी भाविकांना रेल्वेने सुखरुप घरी पोहचवले. रेल्वेने त्यासाठी जे मॉडल वापरले ते आता राजस्थानमध्ये होणाऱ्या खाटू श्याम मेळाव्यात वापरण्यात येणार आहे. 15 मार्चपासून हा मेळावा होणार आहे. प्रथमच राज्य सरकारसोबत समन्वय स्थापन करुन महाकुंभाचे नियोजन करण्यात आले होते.




रेल्वे प्रवास महागला नाही…
कुंभमेळा दरम्यान विमान प्रवास, बस प्रवास आणि नावाने प्रवास महागला होता. परंतु आता रेल्वे प्रवास महागला नाही. रेल्वेने त्याच दरात महाकुंभमेळ्यात प्रवाशांना नेले, असे शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले. या महाकुंभमेळ्यासाठी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत अनेक स्पेशल गाड्या धावल्या होत्या. प्रयागराजसाठी 17,330 रेल्वे या काळात धावल्या. ही रेल्वेसाठी मोठी उपलब्धी आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या, वेळेचे उत्तम व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था यांना प्राधान्य दिले. भाविकांनीही रेल्वेच्या सेवेचा पुरेपूर लाभ घेतला, असे शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले.