Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव, राज्याबाहेर खटला वर्ग करण्याची मागणी
नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Mamata Banerjee made parties in CBI plea seeking transfer of Narada case)
कोलकाता: नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआयने कोर्टात याचिका दाखल करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधी मंत्री मलॉक घटक यांना नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात पक्षकार केलं आहे. तसेच हा खटला राज्याबाहेर वर्ग करण्याची विनंतीही कोर्टाला केली आहे. त्यावर आज दुपारी सुनावणी होणार आहे. (Mamata Banerjee made parties in CBI plea seeking transfer of Narada case)
कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात आज बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी आणि फरहाद हकीम, आमदार मदन मित्रा आणि माजी आमदार शोभन चटर्जी यांच्या याचिकांवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. या चारही नेत्यांच्या अटकेला सीबीआय कोर्टाने स्थिगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती दिली होती. त्यावर पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
आरोपपत्रं तयार
ममता बॅनर्जी आणि मलॉय घटक यांच्याशिवाय सीबीआयने टीएमसी खासदार अॅड. कल्याण बॅनर्जी यांनाही पार्टी केलं आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी खटला भरण्यास मंजुरी दिल्यानंतर सीबीआयने हकीम, मुखर्जी, मित्रा आणि चटर्जी यांना अटक केली होती. सीबीआयने आरोपपत्रं तयार केल्यानंतरच या चारही नेत्यांना अटक केली होती.
चौघेही रुग्णालयात
अटकेनंतर तब्येत बिघडल्याने मंत्री सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि शोभन चटर्जी यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर हकीम यांना मंगळवारी ताप आल्याने त्यांना प्रेसिडेन्सी करेक्शनल होमच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं.
काय आहे नारदा घोटाळा?
पश्चिम बंगालमध्ये 2016च्या निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014मध्ये हे टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक कंपनीकडून कॅश घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या चार नेत्यांचीच नावे नव्हती, तर भाजपमध्ये सामिल झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे होती. (Mamata Banerjee made parties in CBI plea seeking transfer of Narada case)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 19 May 2021 https://t.co/MJ6ZgNTv9L #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
संबंधित बातम्या:
ममता बॅनर्जींचे 2 मंत्री आणि 4 नेत्यांना जामीन मंजूर, CBI कोठडीचा अर्ज फेटाळला
सीबीआयकडून मंत्री, आमदारांना अटक, ममतादीदी खवळल्या; म्हणाल्या, मलाही अटक करा
(Mamata Banerjee made parties in CBI plea seeking transfer of Narada case)