Mamta on RSS: ममता बॅनर्जींकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक, विरोधक म्हणाले संघाची दुर्गा, काँग्रेसही संतापली
ममता यांनी रा. स्व. संघाचे कौतुक केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी म्हमआले आहेत की, ममता यांनी यापूर्वीही संघाचे कौतुक केलेले आहे. 2003 साी ममता यांनी रा. स्व. संघ ही देशभक्त संघटना असल्याचे वक्तव्य केले होते. या बदल्यात संघाने त्यांना दुर्गा ही उपाधी दिली होती. अशी टीकाही ओवेसी यांनी केली आहे. संघाबाबत ममता यांची भूमिका आधीपासूनच संशयास्पद राहिली असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे.
कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. ममता यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे, या वक्तव्यात ममता बॅनर्जी यांनी राषट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक (praise)केले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सगळीच वाईट लोकं नाहीत. त्यातले काही भाजपाचे समर्थन करीत नाहीत, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून तिखट प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झालेली आहे. ममता यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका करण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे.
एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि माकपाने या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. माकपाचे नेते मोहम्मद सलीम यांनी ममता बॅनर्जी या संघाची दुर्गा असल्याची टीका केली आहे. तर ओवेसी म्हमाले की, ममता यांनी यापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभक्त असल्याचे म्हणालेल्या आहेत. या सगळ्या टीकेनंतर ममतांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Kolkata, West Bengal | RSS was not so bad earlier, I don’t think they are bad now either. There are many people in the RSS who are good & don’t support the BJP: West Bengal CM Mamata Banerjee (31.08) pic.twitter.com/Tac3chfppB
— ANI (@ANI) September 2, 2022
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?
बुधवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मोठे वक्तव्य केले होते त्या म्हणाल्या होत्या की – माझ्या नजरेतून पाहिले तर सगळेच संघाचे लोक वाईट नाहीत. अनेक प्रकरणांत ते भाजपाचे समर्थन करीत नाहीत. ममतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय विश्लेषकही आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या प. बंगालच्या निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष सर्वांना परिचित आहेच. त्यावेळी ममता यांच्यावर मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात आलेला आहे.
ओवेसी यांची ममता यांच्यावर टीका
आता ममता यांनी रा. स्व. संघाचे कौतुक केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी म्हमआले आहेत की, ममता यांनी यापूर्वीही संघाचे कौतुक केलेले आहे. 2003 साी ममता यांनी रा. स्व. संघ ही देशभक्त संघटना असल्याचे वक्तव्य केले होते. या बदल्यात संघाने त्यांना दुर्गा ही उपाधी दिली होती. अशी टीकाही ओवेसी यांनी केली आहे. संघाबाबत ममता यांची भूमिका आधीपासूनच संशयास्पद राहिली असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. रा. स्व. संघ या देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात आहे, हे सगळ्यांना माहित आहे. तरीही ममता यांची ही भूमिका आश्चर्यचकित करणारी असल्याी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तृणमूलमधील मुस्लीम नेत्यांनी याबाबत ममता यांची भूमिका स्पष्ट करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काँग्रेसचेही टीकास्त्र
प. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन यांनीही ममतांवर टीका केली आहे. भूतकाळात ममता या संघाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या, याची आठवण त्यांनी करुन दिली आहे. डाव्यांशी लढताना ममता यांनी संघाची आणि भाजपाची मदत मागितली होती, असेही रंजन म्हणाले आहेत. भआजपा संघाच्या विचारधारेवरच काम करीत असताना, ममता यांनी संघाचे कौतुक करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले आहेत.
ममता यांच्या विरोधात विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतरही त्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रया दिलेली नाही. तृणमूल काँग्रेसचे इतर नेतेही या बाबतीत मौन बाळगून आहेत.