Mamta Banarjee: भ्रष्ट मंत्र्याबाबत ममता बॅनर्जींनी झटकले हात, दीदी म्हणाल्या, जन्मठेपेची शिक्षा झाली तरी..

ष्टाचाराचे आरोप असलेल्या या उद्योग मंत्र्याचा कुत्र्यांसाठी स्वतंत्र फ्लॅट असल्याची माहितीही समोर आली आहे. डायमंड सिटीत त्यांचे तीन फ्लॅट्स आहेत त्यापैकी एक फ्लॅट एयर कंडिशन असून तो फक्त कुत्र्यांसाठी आहे. श्वानप्रेमी अशीही पार्थ यांची ओळख आहे.

Mamta Banarjee: भ्रष्ट मंत्र्याबाबत ममता बॅनर्जींनी झटकले हात, दीदी म्हणाल्या, जन्मठेपेची शिक्षा झाली तरी..
अभिनेत्रीने केली टिंगल Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:49 PM

कोलकाता– शिक्षक भरती घोटाळ्यात अटक झालेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी (Minister Parth Chatarjee) यांच्या प्रकरणात पहिल्यांदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्याने जर चूक केली असेल, तर त्याला कितही मोठी शिक्षा झाली तरी आपल्याला फरक पडत नाही, असे ममतादीदींनी स्पष्ट केले आहे. अशा नेत्यांचं समर्थन करता येणार नाही असेही त्या म्हणाल्या. मात्र एका निश्चित कालावधीत सत्याच्या आधारावर या प्रकरणात निर्णय यायला हवा, असेही त्यांनी सांगितले आहे. शनिवारी पार्थ चॅटर्जी यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांना तीन ते चार वेळा फोन केला होता. मात्र ममता दीदींनी त्यांचा फोन उचलला नाही. त्यानंतर या प्रकरणात राज्याचा मंत्री अटक झाल्यानंतर, ममता बॅनर्जी हात वर करतील असे तर्क वितर्क लढवण्यात येत होते.

पार्थ यांना अटक केल्यानंतर आजारी असल्याचे सांगत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावर ईडीने कोर्टात आक्षेप घेतला. बाहेरच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावे, अशी मागणी ईडीने केली. त्यानंतर पार्थ यांना भुवनेश्वरच्या एम्समध्ये नेण्यात आले. तिथे पार्थ यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलने सांगितले.

काय म्हणाल्या ममता

ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की – मी भ्रष्टाचार किंवा चुकीच्या कृत्याचे समर्थन करणार नाही. जर कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा मिळायला हवी. मात्र यानिमित्ताने आपल्याविरोधात दुर्भावनापूर्ण सुरु असलेल्या अभियानाची निंदा करते. पार्टी किंवा सरकारचा अर्पिता मुखर्जी यांच्याशी काहीही संबंध नाही. राजनीती ही माझ्यासाठी बलिदान आहे. तृणमूल चोर आणि दरोडेखोरांना माफ करणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजपा चुकीची आहे. सत्य समोर येईलच.

हे सुद्धा वाचा

पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता यांना अटक

पार्थ यांच्या अटकेनंतर त्यांच्या नीकटवर्तीय अर्पिता यांनाही अटक करण्यात आली आहे. अर्पिता यांना रविवारी ईडीसमोर हजर करण्यात आले. अर्पिता यांच्या कोलकात्याच्या फ्लॅटमधून २१ कोटींची रोख रक्कम आणि १ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले होते. पार्थ यांनी काही फ्लॅट्सपैकी एक फ्लॅट अर्पिता यांना भेट दिला असल्याची माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त पार्थ आणि अर्पिताचे आणखी एक बिल्डिंग बोलपूरच्या शांती निकेतनमध्येही आहे. याची मालकी पार्थ आणि अर्पिता या दोघांचीही आहे. यात सात घरे आणि आप्राटमेंट आहेत. ईडी या सगळ्याची चौकशी करते आहे.

पार्थ चॅटर्जी यांचा कुत्र्यांसाठी स्वतंत्र फ्लॅट

या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या या उद्योग मंत्र्याचा कुत्र्यांसाठी स्वतंत्र फ्लॅट असल्याची माहितीही समोर आली आहे. डायमंड सिटीत त्यांचे तीन फ्लॅट्स आहेत त्यापैकी एक फ्लॅट एयर कंडिशन असून तो फक्त कुत्र्यांसाठी आहे. श्वानप्रेमी अशीही पार्थ यांची ओळख आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.