तर मी मेलेच असते, अपघाताने डोकंच गरगरलं, कसा वाचला जीव?; ममता बॅनर्जी काय काय म्हणाल्या?

बर्दवानच्या गोदर मैदानात ममता बॅनर्जी यांची प्रशासकीय मिटिंग होती. मिटिंग नंतर त्या कारमध्ये बसून कोलकात्याला जायला निघाल्या होत्या. सभा स्थळावरून जीटी रोडवर चढत असताना एक वेगवान कार ताफ्यात घुसल्याने त्यांच्या चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

तर मी मेलेच असते, अपघाताने डोकंच गरगरलं, कसा वाचला जीव?; ममता बॅनर्जी काय काय म्हणाल्या?
Mamata Banerjee Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 8:12 PM

कोलकाता | 24 जानेवारी 2024 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. एका भीषण अपघातातून त्या बचावल्या आहेत. बर्दवान येथून येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बर्दवानहून परत येताना ममता बॅनर्जी आज संध्याकाळी राजभवनात गेल्या आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. तिथेच त्यांनी या अपघाताची माहिती दिली. या अपघातात जीवही गेला असता असं त्या म्हणाल्या. 200 किमी ताशी वेगाने आलेली एक कार त्यांच्या ताफ्यात घुसली. त्यामुळे ड्रायव्हरला एमर्जन्सी ब्रेक मारावा लागला. आताही माझं डोकं गरगरतंय, डोकं दुखत आहे. तापासारखं वाटतंय, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांशी झालेली भेट फलदायी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून राज्यपालांशी चर्चा झाली. येत्या 26 जानेवारी रोजी पुन्हा राजभवनात जाणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

डोक्याला मार

या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्या डोक्याला एक पट्टी बांधलेली होती. कार अचानक माझ्या ताफ्यात आली. ही कार ताशी 200 किलोमीटर वेगाने आली होती. ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे डॅशबोर्डला माझं डोकं आपटलं आणि डोक्याला मार लागला. मार अत्यंत जबरदस्त होता. त्यामुळे माझं अजूनही डोकं गरगरतंय आणि डोकेदुखीही वाढली आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

खिडकी बंद असती तर…

माझं डोकं गरगरत आहे. तरीही मी काम केलं. माझं अंगभरूनही आलं आहे. अंगात कणकणी आहे. आता मी घरी जात आहे, असं त्या म्हणाल्या. माझ्या कारची खिडकी उघडी होती. जर काच बंद असता तर मी मेलेच असते. काच तुटून माझ्या अंगावर आली असती. त्यामुळे मी जखमी झाले असते. असं असलं तरी मी आता घरी जातेय. मी दवाखान्यात जात नाहीये, असं त्यांनी सांगितलं.

याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. कार कुणाची आहे याची माहिती पोलीस घेत आहे. यामागे काही घातपात किंवा षडयंत्र होतं का याचीही पोलीस चौकशी करणार आहेत. पोलिसांना चौकशी करू द्या, असं त्या म्हणाल्या. यापूर्वी बीएसएफचा ड्रेस घालून एक व्यक्ती ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसला होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.