Manipur Viral Video : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड, चार नराधमांना अटक; ‘संसद से सडक तक’ संतापाची लाट

दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर मणिपूरमध्ये तणाव वाढला आहे. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील आहे. 4 मे रोजी ही घटना घडली होती.

Manipur Viral Video : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड, चार नराधमांना अटक; 'संसद से सडक तक' संतापाची लाट
Manipur viral videoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 8:14 AM

इंफाळ | 21 जुलै 2023 : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. देशातील लोक रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. काल संसदेतही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे मणिपूर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. हेरादास असं त्याचं नाव आहे. व्हायरल व्हिडीओच्या मदतीने पोलिसांनी त्याला थौबल जिल्ह्यातून अटक केली आहे. या व्हिडीओत त्याने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. इतर तिघांची ओळख पटवली जात आहे. पोलीस हेरादासची कसून चौकशी करत असून त्याच्याकडून इतर लोकांची नावे आणि त्यांचा पत्ता जाणून घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

मृत्यूदंड देणार

दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर मणिपूरमध्ये तणाव वाढला आहे. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील आहे. 4 मे रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंड देण्याचा सरकार विचार करत आहे. या घटनेतील आरोपींना बुधवार आणि गुरुवारी रात्री दीड वाजता अटक केल्याचं मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सांगितलं.

बलात्कार, अपहरणाचा गुन्हा

पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, साामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींनाही पोलीस पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी 12 पथकांची स्थापना केली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार 800 ते एक हजार लोक अत्याधुनिक शस्त्र घेऊन बी. फेनोम गावात घुसले होते. या जमावाने गावातील मालमत्तेची तोडफोड केली. लुटमार केली. अनेक घरे जाळून टाकली.

भावाची हत्या

या जमावाने एका व्यक्तीला जागीच मारून टाकले. त्यानंतर तीन महिलांना नग्न होण्यास भाग पाडले. त्यातील एका 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. यावेळी तिच्या 19 वर्षीय भावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या करण्यात आली.

लोक रस्त्यावर उतरले

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरून आपला राग, संताप आणि चीड व्यक्त केली आहे. काल संसदेतील दोन्ही सभागृहात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या घटनेवरून जोरदार हंगामा केला. देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं सांगत विरोधकांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध नोंदवला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.