लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. (Manmohan suggests 5 points to tackle Covid-19 crisis in letter to Modi)

लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले
manmohan singh
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 5:17 PM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई गतीमान करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी या पत्रातून केली आहे. (Manmohan suggests 5 points to tackle Covid-19 crisis in letter to Modi)

मनमोहन सिंग यांनी या पत्रातून नरेंद्र मोदी यांचं कोविडमुळे उद्भवलेल्या देशातील समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे. एकून पाच मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतासहीत संपूर्ण जग गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक आई-वडिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलांना पाहिलेलं नाही. आजी-आजोबांनी आपल्या नातवांना पाहिलेलं नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाहिलेलं नाही. अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. महामारीने लाखो लोकांना गरीबीच्या खाईत ढकललं आहे. पुन्हा कोरोनाची लाट आल्याने लोक भयभीत झाले आहेत. जनजीवन केव्हा सुरळीत होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र, लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

लसीकरणाचं टार्गेट काय?

पुढच्या सहा महिन्यांसाठी लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. या लसींचं राज्यांना वितरण कसं होणार? याबाबतची माहिती दिली पाहिजे. जर आपल्याला वेळेत लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर पुरेश्या प्रमाणात ऑर्डर दिली पाहिजे. त्यामुळे लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही त्यावेळेत उत्पादन करणं शक्य होईल, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

45 वर्षाखालील सर्वांना लस द्या

राज्यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीची परिभाषा ठरवण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात यावेत. तसेच 45 वर्षाखालील लोकांनाही लस देण्यास परवानगी देण्यात यावी, असं सांगतानाच भारतातील व्हॅक्सीन निर्मात्यांना सवलती दिल्या पाहिजे. इस्रायलच्या धर्तीवर अनिवार्य लायसेंसिंगची तरतूद केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. (Manmohan suggests 5 points to tackle Covid-19 crisis in letter to Modi)

संबंधित बातम्या:

प्लाझ्मा दान करण्यासाठी ‘त्या’ मुस्लिम तरुणाने रोजा सोडला; दोन महिलांचा जीव वाचला

ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा

प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही; आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं अजब कारण

(Manmohan suggests 5 points to tackle Covid-19 crisis in letter to Modi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.