‘शहीद मुलाचा अभिमान आहे, अश्रू ढाळू नका’, काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस मुदासिर शेख यांच्या वडिलांची देशप्रेम शिकवणारी प्रतिक्रिया

मुदासिर यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले, याचा अभिमान आहे असे शहीद मुदासिर यांचे वडील अहमद शेख यांनी सांगितले आहे. तीन दिवसांपूर्वीच आपल्या मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

'शहीद मुलाचा अभिमान आहे, अश्रू ढाळू नका', काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस मुदासिर शेख यांच्या वडिलांची देशप्रेम शिकवणारी प्रतिक्रिया
Marty Mudasir ShaikhImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 9:51 PM

श्रीनगर – शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे, जम्मू-काश्मीर दलातील पोलीस (Jammu Kashmir Police)कर्मचारी मुदासिर अहमद शेख (Mudasir Ahamed Shaikh) दहशतवाद्यांशी लढताना शहीद (martyred while fighting terrorists )झाले. मुदासिर यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या वडिलांनी, आपल्या मुलाचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपला मुलगा परत येणार नाही, हे माहीत आहे, मात्र मुदासिर यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले, याचा अभिमान आहे असे शहीद मुदासिर यांचे वडील अहमद शेख यांनी सांगितले आहे. तीन दिवसांपूर्वीच आपल्या मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांशी चकमक तीन दहशतवादी यमसदनी

बारमुल्लात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत, जम्मू काश्मीरचे पोलीस कर्मचारी मुदासिर अहमद हेही सहभागी होते. मंगळवारी झालेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सुरक्षादलांनी उभारलेल्या एका नाकाबंदीच्या ठिकाणी ही चकमक झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे. मंगळवारी पूर्ण काश्मिरात नाकेबंदी करण्यात आली होती. करेरी भागातील नजीभात चौकात दहशतवादी आणि पोलिसांत गोळीबार झाला. यात पाकिस्तानी जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले.

दहशतवाद्यांना मारताना पोलीसही शहीद

या चकमकीत पोलीसही शहीद झाले, मात्र तीन मोठ्या दहशतवाद्यांना ठार मारणे, ही मोठी सफलता होती, असे पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले. हे तिन्ही दहशतवादी श्रीनगरकडे येत होते आणि तिथे मोठा हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हे दहशतवादी गुलमर्गच्या डोंगराळ भागात गेल्या तीन चार महिन्यांपासून सक्रिय होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या दहशतवाद्यांवर पोलिसांची करडी नजर होती असेही त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत सैन्यदल आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत २२ पाकिस्तानी दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलेले आहे.

हे सुद्धा वाचा

वडील म्हणाले, अश्रू ढाळू नका, माझा मुलगा शहीद झाला आहे.

झेलमच्या किनाऱ्यावर वसलेल्या बारामुल्ला पोलीस लाईनमध्ये दुखाच्या वातावरमात जेव्हा तिरंग्यात गुंडाळलेले मुादिसर अहमद यांचे पार्थिव पोहचले तेव्हा त्यांचे वडील अहमद शेख मुलाला शेवटची विदाई देण्यासाठी पुढे आले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर येत होता. त्यांनी अतिशय प्रेमाने शेवपेटीला कवटाळले. थोडा दुखाचा आवेग आवरल्यानंतर, ते उभे राहिले. त्यांनी डोळे पुसले. अभिमानाने छाती फुगवली. शेजारी असलेल्या सैनिकांना पाहून म्हणाले, अश्रू ढाळू नका, माझा मुलगा शहीद झाला आहे. त्याने हजारोंचे आयुष्य वाचवले आहे. माझा मुलगा परत येणार नाही हे मला माहित होते, पण मला त्याचा अभिमान आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.