MIG -21 Crash : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 फायटर जेट क्रॅश, पायलट बचावला

राजस्थानच्या बाडमेर (Barmer) जिल्ह्यात भारतीय वायूसेनेचं (Indian Air Force) एक फायटर जेट मिग-21 बायसन क्रॅश झालं आहे. मिग - 21 बायसनच्या क्रॅश ( MiG-21 Crash) होत असतानाच पायलटने विमानातून उडी घेतली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. या अपघातानंतर आता कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे (Court of inquiry ordered) आदेश देण्यात आले आहेत.

MIG -21 Crash : राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 फायटर जेट क्रॅश, पायलट बचावला
राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 क्रॅश
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 7:20 PM

नवी दिल्ली : राजस्थानच्या बाडमेर (Barmer) जिल्ह्यात भारतीय वायूसेनेचं (Indian Air Force) एक फायटर जेट मिग-21 बायसन क्रॅश झालं आहे. मिग – 21 बायसनच्या क्रॅश ( MiG-21 Crash) होत असतानाच पायलटने विमानातून उडी घेतली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. या अपघातानंतर आता कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे (Court of inquiry ordered) आदेश देण्यात आले आहेत. मिग-21 फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर एका शेतात पडलं. मिळालेल्या माहितीनुसार पायलट सुरक्षित आहे. या दुर्घटनेनंतर वायूसेनेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. तर तिथल्या स्थानिकांकडून पाण्याचा मारा करुन आग विझवण्यात आली. (MiG-21 fighter jet crashes in Barmer, Rajasthan, pilot saves his life)

विमान क्रॅश झाल्यानं झोपड्यांना आग, जीवितहानी नाही

मिळालेल्या माहितीनुसार फायटर जेट कोसळलं त्या ठिकाणी काही झोपड्या होत्या. फायटर जेट कोसळलं आणि घासत काही अंतरावर गेल्यानं बाजूला असलेल्या झोपड्यांना आग लागली. दरम्यान, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय. तीन महिन्यांपूर्वीही भारतीय वायूसेनेचं एक मिग-21 फायटर जेट दुर्घटनाग्रस्त झालं होतं. पंजाबच्या मोगामधील बाघापुरानामध्ये मिग-21 क्रॅश झालं होतं. या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला होता. मिग 21 ने सूरतगढ ते हलवारा आणि हलवारा ते सूरतगढ साठी उड्डाण घेतलं होतं. यावेळी बाघापुरानाजवळच्या लंगियाना खूर्द गावात हे विमान क्रॅश झालं होतं.

जानेवारीतही मिग – 21 दुर्घटनाग्रस्त

भारतीय हवाई दलाचं मिग -21 (MiG-21) विमान 5 जानेवारी रोजी राजस्थानच्या सूरतगड भागात क्रॅश झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेदरम्यान विमानाच्या पायलटने मोठ्या हुशारीने स्वत:चा बचाव केला. तो सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं होतं. तांत्रिक कारणांमुळे विमान क्रॅश झालं. या अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले. या अपघातामध्ये विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. विमानाचा मलबा बाहेर काढण्याचं आला. पाक सीमेजवळ सूरतगड हवाई दल तळावरून विमानानं उड्डाण केलं आणि थोड्याच वेळात हा अपघात झाला होता.

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात इंजिनला आग लागली आणि विमान क्रॅश झालं. वैमानिकाने कसा तरी स्वत: चा जीव वाचवला. यानंतर विमान एअरबेसच्या आवारात कोसळलं. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता विमानाने उड्डाण केलं आणि काही मिनिटातच इंजिनातून आग बाहेर येण्यास सुरवात झाली.

इतर बातम्या :  

Video | भर रस्त्यावर आला 10 फुटांचा अजगर, भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचं पुढे काय झालं ?

Video | ‘लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो’, मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल

MiG-21 fighter jet crashes in Barmer, Rajasthan, pilot saves his life

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.