उत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे (Migranant Workers accident at UP).

उत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 9:15 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे (Migranant Workers accident at UP). एका मालवाहू ट्रकने मजुरांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 23 मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत 15 ते 20 मजूर गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Migranant Workers accident at UP).

मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावर उभा होता. मात्र, अचानक एका मालवाहू ट्रकने मजुरांच्या ट्रकला धडक दिली. ही दुर्घटना आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बळी ठरलेले बहुतांश मजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आहेत. हे सर्व मजूर राजस्थानवरुन बिहार-झारखंडला जात होते.

या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मजुरांच्या परिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. आपण मृतमजुरांच्या परिवारासोबत आहोत, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जखमींवर योग्य उपचार केले जावेत, असे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरी परतणाऱ्या देशभरातील कामगारांचे अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना होऊन आठवडाही उलटला नसताना यूपी-एमपीमध्ये घडलेल्या घटनेने देश हादरला. त्यानंतरही अपघाताच्या घटना घडत आहेत.

बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा बसखाली चिरडून मृत्यू

तीन दिवसांपूर्वी बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन चालणार्‍या सहा मजुरांना भरधाव बसने चिरडले. घळौली चेकपोस्टजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. या प्रकरणी अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी, तर यूपीत सहा मजुरांना बसने चिरडले

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी

याशिवाय 14 मे रोजी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला होता.

हेही वाचा : Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये गेल्या शुक्रवारी घडली. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.