कोरोना लसीच्या नोंदणीसाठी CoWIN अॅप? केद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण इशारा
को-विन अॅपबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे (Ministry of Health warn do not download CoWIN app).
मुंबई : कोरोना संकटाची भीषणता लक्षात घेता केंद्र सरकारडून देशात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात कोरोना लसींच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी को-विन नावाच्या अॅपबाबतची माहिती व्हायरल होत आहे. या को-विन अॅपबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे (Ministry of Health warn do not download CoWIN app).
केंद्र सरकारकडून कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी कोणतंही अॅप जारी करण्यात आलेलं नाही. त्यामुळे को-विन नावाच्या अॅपच्या जाळ्यात अडकू नका. या अॅपवर कुणीही आपली वैयक्तिक माहिती टाकू नये. तसेच हा अॅप कुणीही डाऊनलोड करु नका, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून अशाप्रकारचं कोणतंही अॅप जारी करण्यात आलं तर त्याची पूर्वसूचना देण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे (Ministry of Health warn do not download CoWIN app).
Some apps named “#CoWIN” apparently created by unscrupulous elements to sound similar to upcoming official platform of Government, are on Appstores.
DO NOT download or share personal information on these. #MoHFW Official platform will be adequately publicised on its launch.
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) January 6, 2021
रजिस्ट्रेशनच्या नावाने याआधी देखील फसवणूक
कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनच्या नावावर याआधीदेखील सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना फोन करुन कोरोना लस तयार झाली असून त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे, अशी खोटी माहिती देत असल्याची माहिती समोर आली आहे. ते फक्त यावर थांबत नाहीत. तर या लसीची होम डिलिव्हरी केली जात असल्याची माहिती ते फोनवर देत आहेत. त्याचबरोबर ते लोकांकडून होम डिलिव्हरीसाठी पैसेदेखील मागत आहेत. काही भामटे तर लोकांना चिनी कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीच्या वितरणाला सुरुवात झाल्याचं सांगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काही ठिकाणी बिटकॉईनमध्ये पैशांची मागणी केली जात असल्याचं समोर आलं आहे. या सायबर गुन्हेगारांकडून सरकारी योजनेचं नाव सांगत तुमच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे सतर्क राहण्याची जास्त आवश्यक आहे. याबाबत आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनीदेखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक
देशात दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी अनुमती देण्यात आल्यानंतर लसीकरणाची मोहिम कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण देशांचं लक्ष आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन जाधव उद्या (7 जानेवारी) सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत हर्षवर्धन लसीच्या वितरणाबाबत राज्य सरकारकडून काय तयारी सुरु आहे, याबाबत आढावा घेणार आहेत.
संबंधित बातमी :
भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या दीड लाखांवर, नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली