घशघशीत वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, किती टक्के वाढ मिळणार?; पगार किती वाढला?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे.

घशघशीत वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, किती टक्के वाढ मिळणार?; पगार किती वाढला?
Dearness AllowanceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 7:44 AM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्माचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या या डीए आणि डीआरमधील वाढ जानेवारी 2023 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. केंद सरकारने महागाई भत्त्यात घसघशीत आणि घवघवीत वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातवरण आहे.

केंद्र सरकारने काल कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना एरिअर्सही मिळणार आहे. महागाई भत्तावाढीमुळे केंद्रावर दरवर्षी 12,815 कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाढीव महागाई भत्त्याचा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर महागाई भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पगार किती वाढणार?

पगाराच्या हिशोबाने पाहिलं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पे 18000 रुपये असेल तर 38 टक्क्याच्या हिशोबाने 6840 रुपये महागाई भत्ता होतो. आता महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढून 42 टक्के झाल्याने महागाई भत्ता 7560 रुपये होणार आहे. अधिकाधिक बेसिक पेच्या हिशोबाने पाहिले तर 56000 रुपयाच्या आधारे महागाई भत्ता 21, 280 रुपये होईल. त्यात चार टक्क्याची वाढ केली तर तो 23 हजार 520 रुपये होईल. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहिन्याला किमान 720 वाढ होईल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात वर्षाला 8 हजार 640 रुपये वाढ होईल.

मागच्यावेळी महागाई भत्त्यात वाढ किती?

केंद्र सरकारने वार्षिक महागाई भत्त्यात आणि डीआरमध्ये जानेवारीच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या अखेरपर्यंत वाढ केली होती. मात्र गेल्या काही वर्षात ही वाढ कमी झाली. मागच्या सहामाहीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये चार टक्क्याने वाढ झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यावरून 38 टक्के झाला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.