बांगलादेश बनला नवीन पाकिस्तान, हिंदूंवरील हल्ले प्रचंड वाढले, मोदी सरकारने दिली आकडेवारी
Attacks On Bangladeshi Hindu: आठ डिसेंबरपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सन 2024 मध्ये आठ डिसेंबर पर्यंत हिंदू आणि अल्पसंख्याकांवर 2200 हल्ले झाले आहेत. 2022 मध्ये बांगलादेशात 47 हल्ले हिंदूंवर झाले होते.
Attacks On Bangladeshi Hindu: बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यापासून अराजकता निर्माण झाली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले वाढले आहे. अल्पसंख्याक सुरक्षित राहिलेले नाही. परंतु मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार या गोष्टी फेटाळत आहे. आता नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेशची पोलखोल केली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन यांनी संसदेत लिखित उत्तर दिले आहे. त्यात आठ डिसेंबरपर्यंत बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांवर 2200 हल्ले झाल्याचे म्हटले आहे.
डिसेंबरपर्यंत 2200 हल्ले
परराष्ट्र राज्य मंत्री कीर्ति वर्धन यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, आठ डिसेंबरपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सन 2024 मध्ये आठ डिसेंबर पर्यंत हिंदू आणि अल्पसंख्याकांवर 2200 हल्ले झाले आहेत. 2022 मध्ये बांगलादेशात 47 हल्ले हिंदूंवर झाले होते. दुसरीकडे 2024 मध्ये पाकिस्तानात हिंदूंवर 112 हल्ले झाले आहेत. या आकडेवारीवरुन बांगलादेश नवीन पाकिस्तान बनल्याचे स्पष्ट होत आहे.
भारताकडून चिंता व्यक्त
परराष्ट्र मंत्री कीर्ति वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, बांगलादेश आणि पाकिस्तानात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या हल्ल्याची आकडेवारी चिंताजनक आहे. भारताने या घटनांची गंभीर दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने यासंदर्भात त्या देशांकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. भारताने म्हटले आहे की, बांगलादेश सरकार त्या देशातील हिंदू आणि अल्पसंख्याक लोकांच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलेल, असा आम्हाला विश्वास आहे.
अशी आहे आकडेवारी
वर्ष | बांगलादेश | पाकिस्तान |
2022 | 47 | 241 |
2021 | 302 | 103 |
2024 | 2200 | 112 |
दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाकापासून ४० किमी अंतरावर असलेल्या टोंगी शहरात इज्तिमाच्या आयोजनावरून मौलानाच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले. या गोंधळात भारताचे समर्थक मौलाना साद आणि बांगलादेशचे समर्थक मौलाना जुबेर यांच्या समर्थकांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत चार जणांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत.