मोहम्मद शमी हॉटेलात सेक्सवर्कर तरुणींसोबत… हसीन जहांचा गंभीर आरोप; सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

भारताचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद शमी याच्यावर त्याची आधीची पत्नी हसीन जहांने गंभीर आरोप केले आहेत. शमी हा अय्याशी करणारा असल्याचा आरोप हसीनने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मोहम्मद शमी हॉटेलात सेक्सवर्कर तरुणींसोबत... हसीन जहांचा गंभीर आरोप; सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
Mohammed ShamiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 6:06 PM

नवी दिल्ली : प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी चांगलाच अडचणीत आला आहे. त्याची आधीची पत्नी हसीन जहांने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने कोर्टात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली आहे. शमीच्या विरोधातील फौजदारी प्रकरण गेल्या चार वर्षापासून अडकून पडलं आहे. त्यावर त्वरीत निर्णय व्हायला हवा असं हसीनने म्हटलं आहे. तसेच शमीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सही सुरू असल्याचा दावा करून तिने खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे शमीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

2018मध्ये हसीन जहांने शमी आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तिने जादवपूर पोलीस ठाण्यात शमी आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, शमीने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. शमी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो गुजरात टायटन्सकडून खेळत असून आपल्या गोलंदाजीने आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे नवं प्रकरण?

हसीन जहांने कोर्टात फ्रेश याचिका दाखल करून त्यात शमीवर प्रचंड आरोप केले आहेत. कोलकाताच्या सेशन्स कोर्टाने शमीच्या विरोधात कारवाई करण्यावर स्टे लावला आहे. शमी केससाठी पैसेही देत नाही. शमी माझ्याकडून हुंड्याची मागणी करत होता. शमी टीम इंडियासोबत टूरवर गेल्यावर तिथे तो एक्स्ट्रा मटेरियल ठेवायचा, असं हसीनने याचिकेत म्हटलं आहे. प्रसिद्ध व्यक्तींना वेगळी ट्रीटमेंट देऊ नये, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या टूरवर गेलेला शमी दुसऱ्या नंबरचा वापर करून तिथे अय्याशी करायचा. तिथे तो हॉटेलात तरुणींसोबत असायचा. बीसीसीआयच्या दौऱ्यावर असताना शमी हॉटेलात महिलांसोबत अय्याशी करतो. या महिलांशी संपर्क करण्यासाठी शमी वेगळा मोबाईल नंबर यूज करतो, असा आरोप तिने केला आहे. त्याचा फोन कोलकाताच्या लाल बाजार पोलिसांनी जप्त केला होता. मात्र, तरीही शमीची अय्याशी सुरूच आहे, असा आरोप तिने केला आहे.

म्हणून खूश नाही

कोर्टाने शमीला हसीनला एलिमनी अमाऊंट देण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यामुळे हसीन खूश नव्हती. शमीने आपल्याला दर महिन्याला 10 लाख रुपये द्यावेत, अशी हसीनने मागणी केली होती. सात लाख रुपये वैयक्तिक खर्च आणि तीन लाख रुपये मुलीच्या खर्चासाठी मागितले होते. हसीनने शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोपही केले होते. तिच्या या आरोपांची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली होती. तिच्या आरोपांची चौकशीही करण्यात आली. त्यात शमी निर्दोष आढळून आला. हसीनने सातत्याने शमीवर आरोप केले आहेत. तर शमीनेही वारंवार हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.