रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या आईला वाचवण्याची तळमळ, 2 वर्षीय चिमुकलीने असं काय केलं की सगळीकडे चर्चा

आपल्या बेशुद्ध असलेल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी या मुलीने जे केलं आहे, ते वाचून प्रत्येकाचा उर दाटून येईल. उत्तरप्रदेशमधील मोरादाबाद रेल्वेस्थानकावरील हा प्रकार आहे.

रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या आईला वाचवण्याची तळमळ, 2 वर्षीय चिमुकलीने असं काय केलं की सगळीकडे चर्चा
MORADABAD RAILWAY STATION GIRL
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:04 PM

मुरादाबाद : आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी एका दोन वर्षीय मुलीने मोठं काम केलं आहे. तिने उचललेले पाऊल आणि तिच्या कुषाग्र बुद्धीची अनेकजण वाहवा करत आहेत. आपल्या बेशुद्ध असलेल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी या मुलीने जे केलं आहे, ते वाचून प्रत्येकाचा उर दाटून येईल. उत्तरप्रदेशमधील मोरादाबाद रेल्वेस्थानकावरील हा प्रकार आहे. (Moradabad Railway Station Two years old girl saved his unconscious mother)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार मुरादाबाद रेल्वेस्थानकावर एक महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्याजवळ एक सहा महिन्यांचा मुलगा होता. तसेच तिची दोन वर्षांची मुलगी बाजूला बसून रडत होती. या महिलेच्या बाजूला सामानाची बॅग आणि पाण्याच्या बॉटल पडलेल्या होत्या. कशाचीही शुद्ध नसल्यामुळे या महिलेचे सहा महिन्यांचे बाळ सारखे रडत होते. तर दोन वर्षांची चिमुकली हीसुद्धा मदतीच्या अपेक्षेने प्रत्येकाकडे पाहत होती. आपल्या आईला कोणी शुद्धीवर आणले नाही तर तिचे प्राणही जाऊ शकतील हे या दोन वर्षीय मुलीने कदाचित ताडले होते. म्हणूनच की काय धड बोलताही येत नसलेल्या या मुलीने धाडसी काम करुन दाखवले आहे. आपल्या आईला वाचवण्यासाठी तिने थेट आरपीएफ जवानांकडे धाव घेतली आहे.

महिला आरपीएफ कॉन्स्टेबलकडे चिमुकलीची धाव

मोरादाबाद रेल्वेस्थानकावर आपली आई बेशुद्ध होऊन पडल्यामुळे ही दोन वर्षीय मुलगी धाय मोकलून रडत होती. तिला काय करावे हे सूचत नव्हते. शेवटी तिला रेल्वे स्थानकावर उभे असलेले आरपीएफचे जवान दिसले. तिने तत्काळ दूर उभ्या असलेल्या महिला आरपीएफ कॉन्स्टेबलकडे धाव घेतली. तिने या महिला कॉन्स्टेबलचा थेट हात पकडला. तसेच ही छोटी मुलगी या महिला कॉन्स्टेबलला तिच्या आईकडे खेचून नेऊ लागली.

महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले

ही मुलगी काय करते आहे; हे महिला कॉन्स्टेबलला सुरुवातीला समजलेच नाही. नतंर महिला कॉन्स्टेबल त्या मुलीसोबत चालायला लागली. शेवटी त्या दोन वर्षीय चिमुकलीची आई बेशुद्धावस्थेत पडल्याचे आरपीएफच्या जवानांना समजले. नंतर आरपीएफच्या जवानांनी घडलेल्या घटनेची माहिती जीआरपीला (Government Railway Police) दिली. तसेच जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दोन वर्षीय चिमुकलीची सगळीकडे वाहवा

दरम्यान, सहा महिन्यांचे मुल आणि दोन वर्षीय मुलगी असलेल्या या तीस वर्षीय महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेची सध्यातरी ओळख पटू शकलेली नाही. मात्र, आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणीऱ्या या दोन वर्षीय चिमुकलीची सगळीकडे वाहवा होत आहे. सगळे या छोट्या मुलीच्या धैर्याला पाहून सलाम ठोकत आहेत.

इतर बातम्या :

Video | केशरी साडीवर तरुणीचे ठुमके; ‘डान्सिंग डॉल’चा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

Video | भर मंडपात केलं भलतंच काम, नवरदेवाच्या ‘या’ कारनाम्यामुळे व्हिडीओ व्हायरल !

Video | सुरुवातीला महिलेला व्यायामाचा कंटाळा, पैसे पाहताच मूड चेंज ! पाहा व्हायरल व्हिडीओ

(Moradabad Railway Station Two years old girl saved his unconscious mother )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.