PUBG murder: आईचा मारेकरी मुलगा म्हणाला- जेलमध्ये फक्त 3 वर्ष राहायचे आहे, राजकीय नेता होण्याचं स्वप्न, हादरवणारे 19 प्रश्न, 19 उत्तरं

बालसुधारगृहात या आरोपी मुलाची चौकशी झाली तेव्हा त्याने सांगितले की पोलीस ठाण्यात भेटीला आलेले वडील त्याच्यावर रागवले नाहीत. त्यावेळी अजोबा वडिलांवर चिडल्याचेही त्याने सांगितले. अजोबा वडिलांना म्हणाले की तू त्याच्याशी इतक्या प्रेमाने का बोलतो आहेस, या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती या मुलाने दिलेली आहे. जाणून घेवूयात प्रश्न आणि उत्तरे.

PUBG murder: आईचा मारेकरी मुलगा म्हणाला- जेलमध्ये फक्त 3 वर्ष राहायचे आहे, राजकीय नेता होण्याचं स्वप्न, हादरवणारे 19 प्रश्न, 19 उत्तरं
हादरवणारी माहिती समोर...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 8:16 PM

लखनौ– उत्तरप्रदेशची राजधानी लखनौतील 16 वर्षांच्या मुलाने केली आईची (son killed mother)हत्या सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेला आहे. हा 16वर्षांचा अल्पवयीन मुलगा दररोज नवनवे गौप्यस्फोट करतो आहे. आता या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही हत्या करण्यात आल्याचे समोर येते आहे. मुलाने कौन्सिलरशी साधलेल्या संवादात यात संशयाची सुई त्याचे वडील नवीन यांच्याकडेही (blaim came to father)येते आहे. बाल सुधारगृहात असलेला हा अल्पवयीन आरोप दररोज फोनवरुन त्याच्या वडिलांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. घरी येणाऱ्या इस्टेट एजंट अंकलशी असलेल्या आईच्या संबंधांवरुन हा मुलगा अस्वस्थ (angry on mother)होता, त्याने याबाबतची तक्रार आपल्या वडिलांकडे केली होती. त्यातून त्याने आईच्या हातचा मारही खाल्ला होता. मात्र याच संतापातून त्याने आईची हत्या केली असल्याची शक्यता आहे. याबाबत सैन्य दलात असलेल्या वडिलांनीही तुझ्या मनात आहे, ते तू कर असा सल्ला त्याला दिला होता.

वडील पोलीस ठाण्याचतही रागवले नाहीत

बालसुधारगृहात या आरोपी मुलाची चौकशी झाली तेव्हा त्याने सांगितले की पोलीस ठाण्यात भेटीला आलेले वडील त्याच्यावर रागवले नाहीत. त्यावेळी अजोबा वडिलांवर चिडल्याचेही त्याने सांगितले. अजोबा वडिलांना म्हणाले की तू त्याच्याशी इतक्या प्रेमाने का बोलतो आहेस, या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती या मुलाने दिलेली आहे. जाणून घेवूयात प्रश्न आणि उत्तरे.

1. प्रश्न – तुला भीती वाटत नाही का, की तू तुझ्या आईला ठार मारलेस उत्तर – नाही, मला भीती वाटत असती, तर मी गोळी का मारली असती

हे सुद्धा वाचा

2 प्रश्न- तुला काय व्हायचे आहे उत्तर – मला राजकीय नेता व्हायचे आहे.

3. प्रश्न- तुला गर्लफ्रेंड आहे का उत्तर – हो, मला चार गर्लडफ्रेंड आहेत ( हसत)

4. प्रश्न- तुला जेवणात काय आवडते उत्तर- मला अंडा करी आवडते, मी इथे बाल सुधारगृहात तीच ऑर्डर करतो.

5. प्रश्न- फोनवर खेळणे आवडते का उत्तर- हो थोडेफार आवडते

6. प्रश्न- तुला जेलमध्ये जाशील याची तुला भीती वाटत नाही का उत्तर- नाही, जेलमध्ये फक्त ३ वर्षच राहायचे आहे.

7. प्रश्न- घरी कोण कोण येत असे उत्तर- घरात इलेक्टिरशियन अंकल आणि प्रॉपर्टी डीलर अंकल येत असत, ते मला अजिबात आवड नव्हते.

8. प्रश्न – याबाबत तू वडिलांना सांगितले होते का उत्तर – हो सांगितले होते, त्यानंतर पप्पा आणि मम्मीचे भांडण झआले होते. त्यानंतर मम्मीने मला मारले होते.

9. प्रश्न- मग तू काय केलंस उत्तर- मी एक दिवस मम्मी आणि अंकल यांचे फोनवरचे बोलणे ऐकले. त्यात ते पर्सनल बोलत होते.

10. प्रश्न- तुझ्याकडे फोन होता का उत्तर- नाही, माझा फोन आईने काढून घेतला होता. त्यानंतर जेव्हा जेव्हा चोरुन आईचा फोन घेत असे, तेव्हा चोरुन ऐकत असे. फोन रेकॉर्डिंगमध्ये काय काय आहे, हे ऐकत असे. त्यानंतर पप्पांना सांगत असे.

11. प्रश्न – जेव्हा पप्पांना सांगत होता, तेव्हा पप्पा काय म्हणत उत्तर- पप्पा म्हणत की, तुला जर यामुळे राग येतच असेल तर तुला जे वाटते ते तू कर

12. प्रश्न- तुला बंदुकीबाबत माहिती कुणी दिली उत्तर- पप्पा माझ्यासमोर पिस्तूल साफ करीत असत, आणि त्यांनी मला बंदूक कुठे ठेवली आहे हे सांगितले होते.

13. प्रश्न- मग काय झाले उत्तर – एक दिवस प्राॉपर्टीवाले अंकल घरी डीनरसाठी आले होतेस तेव्हा ते थांबले होते. त्यावेळी पप्पा आणि मम्मीत मोठं भांडण झालं होतं. त्यादिवशी मम्मीने मला जेवण दिले नाही, आणि मला मारहाण केली होती.

14. प्रश्न- पप्पा काही म्हणाले होते का उत्तर- पप्पा मला म्हणाले होते की, तुला जे वाटतं ते तू कर, मी काही करु शकत नाही, मी बांधील आहे. तू नाहीस

15. प्रश्न- मम्मी कधी बाहेर गेली होती का उत्तर- एकदा मम्मी बाहेर गेली होती. तेव्हा अंकल घरी आले होते. मम्मी दोन दिवस घराच्या बाहेर गेली होती.

16. प्रश्न- का उत्तर – पप्पांना मी सांगितल्यानंतर त्यांनी मला काही दिवस आजीकडे पाठवलं होतं. तेव्हा मम्मी बाहेर गेली होती. त्यानंतर पप्पांना हे सगळं कळलं.

17. प्रश्न- मग पप्पांना राग आला होता का उत्तर- त्यावेळी त्यांना बराच राग आला होता. त्यांचे मम्मीशी मोठे भांडण झाले होते. त्यानंतर मम्मीने घरातील सगळ्या काचा तोडल्या होत्या. इतकंच नाही तर मला काठीने मारले होते.

18. प्रश्न- प्रॉपर्टीवाले अंकल येत तेव्हा तू आणि बहीण कुठे राहत असत उत्तर- ते आल्यावर, मम्मी आणि ते एका खोलीत असत आणि मी आणि बहीण दुसऱ्या खोलीत असे. माझ्याकडे फोन नसल्याने, मी ते पप्पांना सागू शकत नव्हतो. बाहेर जाऊन पप्पांना सांगायची इच्छा होत असे, पण मम्मी स्कूटी देत नसे. मी जबरदस्तीने स्कूटी घएून जात असे, त्यानंतर मम्मी मला मारहाम करत असे.

19. प्रश्न- पप्पा तुला कधी ओरडले होते का उत्तर- पप्पा प्रत्येक गोष्टीत माझी मदत करीत असत. तु काहीही कर, घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे. असे ते नेहमी सांगत असत.

ही या मुलाची चौकशी आणि त्याने दिलेली उत्तरे ही परिस्थिती उघड करण्यासाठी पुरेशी बोलकी आहे, असेच दिसते आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.