ह्योच नवरा पाहयजे! भाजप खासदारासाठी दोन पत्नींचे करवा चौथचे व्रत; पहिली शिक्षिका तर दुसरी…
मीणा यांनी राजस्थानच्या मोहनलाल सुखडिया विद्यापीठातून एमकॉम, बीएड आणि एलएलबीचं शिक्षण घेतलेलं आहे. ते 2003 ते 2008पर्यंत आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून विजयी झाले आहेत.
चंदीगड: देशभरात गुरुवारी करवाचौथचे पर्व (karva chauth) धुमधडाक्यात साजरं करण्यात आलं आहे. मात्र, चर्चा राहिली ती राजस्थानातील एका करावचौथ व्रताची. राजस्थानचे उदयपूरचे भाजपचे खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या घरच्या करवाचौथची. 58 वर्षीय खासदार मीणा (arjunlal meena) यांनी आपल्या दोन पत्नीसोबत (two wives) करवाचौथचं व्रत साजरं केलं. त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
खासदार अर्जुनलाल मीणा यांचा विवाह दोन मिनाक्षी आणि राजकुमारी या दोन महिलांशी झालाय. मिनाक्षी आणि राजकुमारी या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. राजकुमारी या शिक्षिका आहेत. तर मिनाक्षी या गॅस एजन्सीच्या मालकीन आहेत. या दोघींनीही मीणआ यांना ओवाळत करवाचौथ साजरा केला. करवाचौथ व्रताचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
करवा चौथचे पर्व गुरुवारी देशभर साजरं करण्यात आलं. हिंदू धर्मात करवा चौथला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ठेवलं जातं. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दिर्घायुष्याची कामना करतात आणि निर्जला व्रत ठेवतात. चंद्र दर्शनानंतर पतीची पूजा करतात.
2019मध्ये मीणा हे उदयपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. राजस्थानातून विजयी झालेल्या भाजपच्या 25 खासदारांपैकी ते एक आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले होते.
मीणा यांनी राजस्थानच्या मोहनलाल सुखडिया विद्यापीठातून एमकॉम, बीएड आणि एलएलबीचं शिक्षण घेतलेलं आहे. ते 2003 ते 2008पर्यंत आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून विजयी झाले आहेत.