जगावेगळी लग्नपत्रिका, पठ्ठ्याने थेट लग्नपत्रिकेवर धोनी याचा फोटो छापला; कोण आहे हा बहाद्दर?

तुम्ही अनेक प्रकारचे फॅन पाहिले असतील. अनेकांची बॉलिवूड कलाकार किंवा क्रिकेटपटूंबाबतची प्रेम व्यक्त करण्याची वेगवेगळी पद्धत पाहिली असेल. पण धोनीच्या एका फॅनने चक्का...

जगावेगळी लग्नपत्रिका, पठ्ठ्याने थेट लग्नपत्रिकेवर धोनी याचा फोटो छापला; कोण आहे हा बहाद्दर?
Wedding CardImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 6:53 AM

रायपूर : अभिनेते आणि क्रिकेटपटू यांच्या फॅन्स जगाच्या कानाकोपऱ्यात असतात. त्यांच्या फॅन्सचं वेडही जगजाहीर आहेच. काही फॅन्स तर असं काही करतात की अरे आता स्वत:ला आवर… असं करू नको, असं सांगण्याची वेळ सेलिब्रिटींवरही येते. आता प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी याच्या फॅनने असं काही केलं की त्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडियात सुरू आहे. धोनीच्या या फॅनने त्याच्या लग्नपत्रिकेवर स्वत: ऐवजी धोनीचा फोटो छापला. ही लग्नपत्रिका तुफान व्हायरल होत आहे. लग्नपत्रिकेवर धोनीच्या फोटोसहीत त्याचा जर्सी नंबर आणि नावही प्रिंट केलं आहे. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या तरुणाने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे तो आणि त्याची लग्नपत्रिका चर्चेचा विषय बनली आहे.

हे सुद्धा वाचा

तुम्ही अनेक लग्नपत्रिका पाहिल्या असतील. त्या लग्नपत्रिकेवर नवरदेव-नवरीचं नाव, त्यांच्या आईवडिलांचं नाव, कुटुंबीयांचं नाव आणि लग्नाची तारीख, हळदीचा कार्यक्रम, ठिकाण आणि वेळ या सर्व गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. लग्नपत्रिकेतील क्रिएटीव्हिटीही पाहिली असेल. या लग्नपत्रिका सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. काही लग्नपत्रिकांची चर्चाही होत असते.

या व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिका पाहून हसू आवरणेही कठिण होतं. आजवर तुम्ही लग्नपत्रिकेवर नवरदेव नवरीचा फोटो पाहिला असेल. पण एखाद्या व्यक्तीने आपल्या लग्नपत्रिकेवर दुसऱ्याचा फोटो छापलेला पाहिला आहे काय? तसा विचारही कोणी करू शकत नाही. मात्र छत्तीसगडच्या या पठ्ठ्याने ही करामत केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

लग्नाचं निमंत्रण

या लग्नपत्रिकेवर महेंद्रसिंह धोनीचा फोटो आहे. त्यासोबत धोनीचं नाव आणि त्याचा जर्सी नंबरही छापण्यात आला आहे. दीपक पटेल असं या धोनीच्या फॅनचं नाव आहे. तो मिलुपाराच्या कोंडकेल जिल्ह्यातील रहिवासी आहे. लग्नपत्रिकेवर केवळ धोनीचा फोटो छापून तो थांबला नाही. तर त्याने धोनीला चक्क लग्नाला येण्याचं आमंत्रणही पाठवलं आहे. त्यामुळे त्याच्या या धोनीप्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. दीपक हा लहानपणापासूनच धोनीचा जबरा फॅन आहे. तो धोनीला आपला आदर्श मानतो. त्यामुळेच त्याने आपल्या लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो छापल्याचं सांगितलं जात आहे.

लग्नपत्रिकेवर काय?

ही लग्नपत्रिका पिवळ्या रंगाची आहे. लग्नपत्रिकेवर एका बाजूला गणपतीचा फोटो आहे. स्वास्तिक चिन्हात गणपतीचा फोटो आहे. त्याच्या बाजूला सात नंबरचा आकडा दाखवला असून त्या आकड्यामध्ये धोनीचा फोटो आहे. त्यावर धोनी आणि खाली थाला असं लिहिलं आहे. त्यानंतर खाली दीपक आणि गरिमा असं लिहिलं आहे. नंतर शुभ विवाह असं लिहून लग्नाची तारीख बुधवार 7 जूनलिहिली आहे.

लग्नपत्रिकेच्या दुसऱ्या बाजूला पिवळ्या पार्श्वभूमीवर निळा गोलाकार काढला आहे. त्यात सात नंबर लिहिला आहे. बाजूला धोनीचा फोटो आणि खाली थाला असं लिहिलं आहे. त्याने धोनीसह चेन्नई सुपर किंग्जलाही लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.