Uttar Pradesh | महिलेने दिराच्या मदतीने केली प्रियकराची हत्या; मृतदेहाचे 12 तुकडे केले, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना

लवकुश असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याचे उघडकीस आले आहे. हत्या झालेला लवकुश हा गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी त्याची पत्नी पोलिसांकडे न्यायासाठी याचना करत राहिली होती.

Uttar Pradesh | महिलेने दिराच्या मदतीने केली प्रियकराची हत्या; मृतदेहाचे 12 तुकडे केले, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 6:24 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एका महिलेने दिराच्या मदतीने तिच्या प्रियकराची हत्या केली. त्यानंतर दिराने मृतदेहाचे 12 तुकडे करून ते घाघरा नदीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रामनगर पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपी महिला व तिच्या दिराला अटक केली आहे. दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली असून या प्रकरणाचा रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस घटनेमागील आणखी धक्कादायक गुपितांचा उलगडा करण्याच्या दृष्टीने अधिक तपास करीत आहेत.

अनैतिक संबंधातून हत्याकांड

लवकुश असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याचे उघडकीस आले आहे. हत्या झालेला लवकुश हा गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी त्याची पत्नी पोलिसांकडे न्यायासाठी याचना करत राहिली होती. लवकुशचे अमोली काला येथील महिलेशी अनैतिक संबंध होते. या महिलेचा पती तुरुंगात असल्याने तिच्या दिराला ही बाब कळताच त्याने लवकुशला आपल्या मार्गातून हटवण्याचा कट रचला.

लवकुशचे 12 तुकडे करुन नदीत फेकले

महिलेच्या दिराने लवकुशला घरी बोलावून त्याची हत्या केली. एवढेच नव्हे तर हत्या केल्यानंतर लवकुशच्या मृतदेहाचे तुकडेतुकडे करून ते काही अंतरावरील घाघरा नदीत फेकून देण्यात आले. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी लवकुश हा महिलेला भेटण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. नंतर आरोपी दिराने वहिनीला तिच्या माहेरी पाठवले. त्यानंतर त्याने लवकुशचे 12 तुकडे रामनगर येथून बांका येथे नेले आणि पोत्यांमध्ये भरून घाघरा नदीत फेकून दिले. यानंतर सर्विलान्सच्या मदतीने रामनगरचे प्रभारी निरीक्षक विनोद बाबू मिश्रा यांच्या पथकाने घटनेचा खुलासा करून दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली.

लवकुश जैस्वाल हा भैरमपूर येथील रहिवासी असून अमोली काला येथील कॉन्ट्रॅक्टच्या शेजारी त्याचे अंड्याचे दुकान होते. याच परिसरात राहणाऱ्या लवकुशचे एका महिलेशी अवैध संबंध जुळले. महिलेचा पती फेब्रुवारीमध्ये एका खटल्यात तुरुंगात गेला होता, त्याच दरम्यान लवकुशचे महिलेशी अनैतिक संबंध होते. महिलेच्या दिराला याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने लवकुशचा काटा काढायचा ठरवले. महिलेने लवकुशला घरी बोलावले आणि तिच्या दिराने त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Murder of a person in an immoral relationship in Uttar Pradesh)

इतर बातम्या

Hariyana: ‘मोक्ष’ प्राप्तीचा येडा नाद, लेकरं बाळं, बायको जीवानीशी बाद, एकाच घरात 5 मृतदेह, पोलीसांना कशाचा संदेह?

Girl Suicide | लैंगिक छळाला कंटाळून अकारावीतील मुलीनं जीव दिला! सुसाईड नोटमुळे गुंता वाढला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.