Surat Murder Case: सूरतमध्ये एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीची हत्या, वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट
आरोपीला अटक केल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी 2500 पानांचे आरोपपत्र तयार केले असून 190 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एकाही साक्षीदाराला पोलिस ठाण्यात न बोलावता त्यांच्या घरी जाऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत, असे सूरत रेंजचे आयजी राजकुमार पांडियन यांनी सांगितले.
सूरत : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाकडून भररस्त्यात तरुणीवर चाकूने वार करुन तिची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना 12 फेब्रुवारी रोजी सूरतमध्ये घडली. तरुणीसोबत शिक्षण घेत असलेल्या तरुणानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. फनील गोयानी असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून मयत तरुणी ग्रीष्मा वेकारिया आणि आरोपी तरुण एकत्र शिक्षण घेत होते. तरुणाने हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून करण्यापूर्वी आरोपीने इंटरनेटवर एके-47 (AK-47) आणि इतर शस्त्रे शोधली होती. वेब सिरीजही पाहिल्या. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. फनीलने सूरतमधील कामरेज भागात ग्रीष्माची हत्या केली होती. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. याशिवाय एका कॅफेमध्ये आणि ज्या ज्या दुकानात तो चाकू घेण्यासाठी गेला होता त्या सर्व दुकानात घेऊन गेले. (Murder of a young woman in Surat out of one-sided love)
आरोपीविरोधात 2500 पानांचे आरोपपत्र
आरोपीला अटक केल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी 2500 पानांचे आरोपपत्र तयार केले असून 190 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एकाही साक्षीदाराला पोलिस ठाण्यात न बोलावता त्यांच्या घरी जाऊन त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत, असे सूरत रेंजचे आयजी राजकुमार पांडियन यांनी सांगितले. तसेच खून करण्यापूर्वी आरोपीने इंटरनेटवर एके-47 आणि इतर शस्त्रे शोधली होती. वेब सिरीजही पाहिल्या होत्या. खून प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
इचलकरंजीतील मायलेकीकडून बापाची निर्घृण हत्या
मायलेकीच्या प्रेमप्रकरणाला विरोध करीत असल्याने दोघींनी संगनमताने बापाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील बर्गे मळा परिसरात घडली आहे. याप्रकरणी गोधी मायलेकीला शिवाजनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (40) असे मयत इसमाचे नाव आहे. डोक्यात लोखंडी गज आणि बॅटने मारहाण करीत शांतिनाथ यांची हत्या करण्यात आली. साक्षी केटकाळे असे आरोपी मुलीचे तर सुजाता केटकाळे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. आई आणि मुलीच्या प्रेमसंबंधावरुन केटकाळे कुटुंबात नेहमी वाद सुरु होते. शांतिनाथ यांनी पत्नी आणि मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या ऐकायला तयार नव्हत्या. याचमुळे कुटुंबातील वाद विकोपाला गेला आणि मुलगी साक्षीने लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केला. या मारहाणीत शांतिनाथ यांचा मृत्यू झाला. (Murder of a young woman in Surat out of one-sided love)
इतर बातम्या
Pune crime | बारामतीतील माळेगाव येथे दिवसा- ढवळ्या घर फोडत ‘इतक्या’ लाखांची रोखड लंपास