Uttar Pradesh : जमिनीच्या वादातून तरुणाकडून भाला मारुन चुलत भावाची हत्या, हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दोघा चुलत भावांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या वादातून पोलिसांकडे अनेकदा तक्रारीही केल्या गेल्या होत्या. मात्र याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर हा वाद हत्या करण्यापर्यंत पोचला.

Uttar Pradesh : जमिनीच्या वादातून तरुणाकडून भाला मारुन चुलत भावाची हत्या, हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 2:25 AM

उत्तर प्रदेश : जमिनीच्या वादातून एका तरुणाने दिवसा ढवळ्या भाला मारुन आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे घडली आहे. हत्येच्या या घटनेचा व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

शेतामध्ये झालेल्या वादाचे हत्याकांडामध्ये रूपांतर

शाहजहांपूरच्या बांदा पोलीस स्टेशन हद्दीतील बरीवारा गावातील ही घटना घडली आहे. सरकारी जमिनीवरील कब्जावरून हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे. साहब सिंग आणि निर्मल सिंग हे चुलत भाऊ असून या दोघांमध्ये जमिनीचा वाद सुरू आहे. यापैकी साहब हा शनिवारी सकाळी शेतात ऊस सोलत होता. त्याचवेळी त्याचा चुलत भाऊ निर्मल सिंग हा भाला घेऊन शेतात पोहोचला. यादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. पुढे दोघांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हत्याकांडामध्ये घडले. निर्मल सिंगने भालाच्या साहाय्याने साहेब सिंगची निर्घृण हत्या केली आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.

अनेक दिवसांपासून सुरु होता वाद

दोघा चुलत भावांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या वादातून पोलिसांकडे अनेकदा तक्रारीही केल्या गेल्या होत्या. मात्र याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर हा वाद हत्या करण्यापर्यंत पोचला. हत्येतील मुख्य आरोपी निर्मल सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत. लवकरच अन्य आरोपींनाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी एका आरोपीला अटक केली

स्थानिक पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एएसपी संजीव कुमार बाजपेयी यांनी घटनेच्या वृत्ताला दुजोरा देत अधिक माहिती दिली. हत्येबाबत खबर मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी निर्मल सिंग याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असे बाजपेयी यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. फरार आरोपी लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Murder of cousin by youth in Uttar Pradesh land dispute)

इतर बातम्या

Uttar Pradesh: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या

Barabanki: गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात, पतीकडून पतीला तिहेरी तलाक

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.