चहा विक्रेता कानाराम मेवाड यांचा देशाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न

प्लास्टिक एकीकडे गंभीर समस्या बनत असताना एक चहावाला मात्र या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

चहा विक्रेता कानाराम मेवाड यांचा देशाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 9:34 PM

My India My Life Goals : प्लास्टिकचा शोध हा जगासाठी सुरुवातीला वरदान ठरेल असं वाटत होतं. पण आज प्लास्टिक हे जगासाठी समस्या बनले आहे. आज अनेक गोष्टी या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दिल्या जातात. अनेक गोष्टी प्लास्टिकच्या बनवलेल्या जातात. प्लॅस्टिकच्या वस्तू रोजच्या कामात येऊ लागल्या. आज प्लास्टिक एक इतमी मोठी समस्या बनली आहे की आता त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्लॅस्टिकमुळे आज जगभरात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक संघटना यासाठी काम करत आहेत. तर काही लोकांनी वैयक्तिक या समस्येवर मात करण्यासाठी विडा उचलला आहे. प्लास्टिकवर अनेक देशात बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये भारत आघाडीवर आहे. भारत सरकारने 2022 मध्येच एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली, तर दुसरीकडे देशात वैयक्तिक प्रयत्नही सुरू झाले.

राजस्थानचे कानाराम मेवाड यांनी देखील यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. राजस्थानमध्ये त्यांची ओळख कांजी चायवाला अशी आहे. चहाचा व्यवसाय करणारे कानाराम मात्र खूप मोठं काम करत आहेत. प्लास्टिक नष्ट करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

कानाराम मेवाड यांची राजस्थानच्या बिसलपूरमध्ये चहाची टपरी आहे. कानाराम म्हणतात की, प्लास्टिक हा या जगाचा शत्रू आहे, ज्याला लोकांनी घरात ठेवले आहे. प्लॅस्टिकविरोधातील मोहिमेबद्दल कानाराम सांगतात की, आम्ही आमच्या गावात आणि आजूबाजूला दुधाची पॅकेट, ब्रेडची पाकिटे यासारख्या घरगुती वस्तूंमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचे घरोघरी जाऊन संकलन सुरू केले. त्या बदल्यात आपण लोकांना काही ना काही देत ​​असतो. या योजना दर महिन्याला बदलत राहतात.

कानाराम सांगतात की दर महिन्याला 200 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक त्यांच्याकडे येते. आम्ही त्याचा पुनर्वापर करत आहोत. ते म्हणतात की, या भागातील लोकांना आता पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी कळू लागली आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कानाराम इतर लोकांना ही आपली जबाबदारी समजून देशाला पुढे नेले पाहिजे. असे आवाहन करत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.