चीनमध्ये लहान मुलांमध्ये झपाट्याने पसतोय संसर्ग, भारतात काय आहे परिस्थिती
New virus in china : चीनमध्ये सध्या नव्या संसर्गाने थैमान घातले आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाचे परिणाम दिसत आहेत. अनेक मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. कोरोना सारख्या संकटानंतर आता नवा संसर्गाने जगाच्या चिंता वाढवल्या आहेत.
मुंबई : चीनमधील मुलांमध्ये N9N2 ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. अनेकांना श्वसनाचे आजारही होत आहेत. लोकांना सावध राहण्याचं आवाहन केले जात आहे. स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. श्वसनाचे आजार असल्यास इतर लोकांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जात आहे. भारतात असे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. भारताने सावधगिरी बाळगण्याची सल्ला देखील दिला जात आहे.
N95 आणि N99 मास्क वापरण्याचा सल्ला
चीनमध्ये न्यूमोनियाचा लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात परिणात होताना दिसत आहे. मुलांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मुलांमध्ये खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणं दिसल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा सल्ला दिला जात आहे.
डब्ल्यूएचओ कडून चिंता व्यक्त
लहान मुलांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने चीनमधील परिस्थिती बिकट झाली आहे. WHO याबद्दल खूप चिंतित आहे. श्वसनाशी संबंधित समस्या मुलांमध्ये दिसून येत आहे. अनेक शाळांनी मुलांना शाळेत न येण्यास सांगितले आहे. त्यामुळे परिस्थिती निश्चितच गंभीर दिसत आहे.
कोविडमुळे बालकांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाला आहे, परिणामी प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. मुलांमध्ये संसर्ग वाढल्याचे दिसत आहे.
भारतात अद्याप एकही प्रकरण नाही
जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडून तपशीलवार माहितीची विनंती केली. भारतात या आजाराबाबत काळजी करण्याची गरज नाही, कारण त्याची लक्षणे अद्याप देशात दिसून आलेली नाहीत. त्यामुळे लोकांनी घाबरू जाण्याची गरज नाही. या नवीन इन्फ्लूएंझाबद्दल उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे, महामारीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. आदरवर्षी हिवाळ्यापूर्वी इन्फ्लूएंझा प्रकरणांची संख्या वाढते आणि हे प्रकरणांमध्ये असामान्य वाढ दर्शवत नाही.