नारदा घोटाळा: पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या धाडी; मंत्र्यासहीत चार टीएमसी नेत्यांना अटक

नारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सकाळी टीएमसीचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा, सुब्रत मुखर्जी आणि सोवन चॅटर्जी यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत. (Narada sting: TMC Minister Firhad Hakim Claims Arrest By CBI ‘without Notice’)

नारदा घोटाळा: पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या धाडी; मंत्र्यासहीत चार टीएमसी नेत्यांना अटक
Firhad Hakim
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 10:39 AM

कोलकाता: नारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज सकाळी टीएमसीचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा, सुब्रत मुखर्जी आणि सोवन चॅटर्जी यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत. त्यानंतर सीबीआयने मंत्री हकीम यांच्यासह चार टीएमसी नेत्यांना अटक केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Narada sting: TMC Minister Firhad Hakim Claims Arrest By CBI ‘without Notice’)

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येताच सीबीआयने पुन्हा एकदा नारदा घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

छापेमारीही

त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. तसेच भाजपचे एकेकाळचे नेते सोवन चॅटर्जी यांच्या घरीही छापेमारी केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सोवन चॅटर्जी यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज्यपालांनी मंजुरी दिली होती

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारद स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

काय आहे नारदा घोटाळा?

पश्चिम बंगालमध्ये 2016च्या निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014मध्ये हे टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक कंपनीकडून कॅश घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या चार नेत्यांचीच नावे नव्हती, तर भाजपमध्ये सामिल झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे होती. (Narada sting: TMC Minister Firhad Hakim Claims Arrest By CBI ‘without Notice’)

संबंधित बातम्या:

गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!

Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात संघर्ष सुरूच, मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अनेकजण जखमी

(Narada sting: TMC Minister Firhad Hakim Claims Arrest By CBI ‘without Notice’)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.