AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

Narendra Giri Death: आता कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरमधून अनेक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू होण्याच्या 6 ते 10 तास आधी ज्या ज्या लोकांशी नरेंद्र गिरी बोलले, त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे.

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?
महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट मिळाली
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 12:09 PM
Share

प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी (Narendra Giri Death) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आणि त्यानंतर आता अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र गिरी हे अल्लापूरच्या बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते. मात्र आता महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, आधी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली होती तर आता कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरमधून अनेक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू होण्याच्या 6 ते 10 तास आधी ज्या ज्या लोकांशी नरेंद्र गिरी बोलले, त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे. पोलिस तपासादरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली होती. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतं आहे. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्यानं आता आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.( Narendra Giri Death 7 page suicide note of Mahant Narendra Giri Maharaj)

शिष्य म्हणाला, हा कोट्यवधींचा खेळ

दरम्यान, सुसाईड नोटच्या आधारावर नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान, नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याची शक्यता त्याने नाकारली आहे. तो म्हणाला की, प्रयागराजचे आयजी यात संशयित आहे, ते सतत नरेंद्र गिरी यांच्या संपर्कात असायचे. आनंद गिरीने आरोप केला की, मठ आणि मंदिराजवळ असलेली संपत्ती हडपण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली. या कटात अनेक मोठे मासे गुंतलेले असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. विशेष गोष्ट म्हणजे, नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांच्या मठातील खोलीत मिळून आला. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत होता आणि खोलीचे सर्व दरवाजे बंद होते. खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून निवेदन जारी

प्रयागराज पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की घटनास्थळावर जवळपास 7 पानी चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी आणि अन्य शिष्यांचं नाव लिहिलं आहे. तसंच ते अनेक कारणांमुळे मानसिक तणावातून जात होते. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.

आश्रमाचं काय करायचं? चिठ्ठीत उल्लेख

महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये आश्रमबाबत काय करायचं याबाबतही लिहिलं आहे. तसंच कुणाची काळजी घ्यायची. कुणाला काय द्यायचं आहे, याबाबतही त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय. आपल्या शिष्यांमुळे दु:खी असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

शवविच्छेदनानंतर अजून पुरावे मिळणार

दरम्यान, मंगळवारी दुपारी 2 वाजेनंतर नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन होणार आहे. या शवविच्छेदनानंतर अजून पुरावे मिळू शकतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान महंत गिरी यांच्या आत्महत्येची माहिती त्यांचे शिष्य बबलू याने फोनवरुन पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नरेंद्र गिरींना फासावरुन खाली उतरवलं

हेही वाचा:

Narendra Giri Death | अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीत 7 पानी सुसाईड नोट! शिष्य आनंद गिरीचं नाव

 

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.