Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र शासनाचा मोठा निर्णय, कर्मचारी भरतीची ही परीक्षा आता मराठीतून

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केंद्राची भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजीत होती. परंतु आता ही परीक्षा मराठीसुद्धा होणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना वाव मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली.

केंद्र शासनाचा मोठा निर्णय, कर्मचारी भरतीची ही परीक्षा आता मराठीतून
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 3:44 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारने केंद्रीय परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राची ही परीक्षा मराठीसह 13 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता केंद्र सरकारच्या सेवेत जाणे मराठी तरुणांनाही सोपे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी स्थानिक तरुणांच्या सहभाग वाढवण्यासाठी ही परीक्षा विविध भाषेत घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील ट्विट त्यांनी केले. ही परीक्षा आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजी भाषेत होत होती.

कोणती परीक्षा होणार

हे सुद्धा वाचा

CAPF कॉन्स्टेबल भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजीत होती. आता या दोन भाषांशिवाय मराठीसह 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा हिंदी आणि इंग्रजीशिवाय १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यास गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

काय केले ट्विट

अमित शाह यांनी ट्विट केले की, गृह मंत्रालयाने 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. प्रादेशिक भाषांच्या विकास आणि संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कटिबद्धता या निर्णयातून दिसून येते.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), आसाम रायफल्समध्ये SSF, रायफलमन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील कॉन्स्टेबल (GD) च्या भरती परीक्षेत समाविष्ट केलेल्या 13 प्रादेशिक भाषा आहेत. या भाषांचा आहे समावेश 1. मराठी

2. बंगाली

3. गुजराती

4. आसामी

5. मल्याळम

6. कन्नड

7. तमिळ

8. तेलुगु

9. ओरिया

10. उर्दू

11. पंजाबी

12. मणिपुरी

13. कोकणी

भरती परीक्षेत भाषेवरून काय वाद झाला?

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 9,212 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी 579 पदे तामिळनाडूतून भरले जाणार आहेत. त्यासाठी 12 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. याशिवाय 100 पैकी 25 गुण हिंदीच्या मूलभूत आकलनासाठी ठेवण्यात आले आहेत, याचा फायदा हिंदी भाषिक उमेदवारांना होईल. यामुळे तामिळनाडूतील राजकीय नेत्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिले होते.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.