Nawab Malik : नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन, काय आहे कारण?

nawab malik money laundering case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर केला आहे.

Nawab Malik : नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन, काय आहे कारण?
nawab malik
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 4:25 PM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात मलिक यांना अटक झाली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन मिळाला आहे.

उच्च न्यायालयाने फेटाळला होता जामीन

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अन् गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मलिक अडचणीत आले होते. अटक केल्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. परंतु सर्वोच्च न्यायालायने प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

काय आहे आजार

नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मलिक हे आजारी असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात पटवून दिले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ दिला. यामुळे मलिक जामीनासाठी पात्र असल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण

ईडीने दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी इक्बाल कासकर याला मनी लॉण्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान मलिक यांचे नाव पुढे आले होते. दाऊद इब्राहिम हा रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो. यामध्ये मलिक यांचा सहभाग असल्याचा आरोप मलिक यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने (ED) धाड टाकली होती.

जामिनासाठी अनेकदा प्रयत्न

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आधी ईडी कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मलिक यांनी जामीन मिळविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. प्रकृतीचे कारण पुढे करत त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र दरवेळी त्याचा जमीन अर्ज फेटाळण्यात येत होता. अखेर दीड वर्षानंतर कोर्टाने त्यांना प्रकृतीचता कारणावरून दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.