पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन अन् शाहरुख खान, अक्षयकुमार, अनुपम खेर आले पुढे…
New Parliament of India Opening : नवीन संसद भवनाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संसद भवनाची भव्यता दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओसंदर्भात आवाहन केले होते. त्यानंतर शाहरुख, अक्षय अन् अनुपम खेर पुढे आले.
नवी दिल्ली : देशाला नवं संसद भवन रविवारी मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात देशाच्या नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचा व्हिडिओ शेअर केला आहे अन् आवाहन केले. त्याला शाहरुख खान, अक्षयकुमार अन् अनुपम खेर यांनी लगेच प्रतिसाद दिली.
काय केले होते मोदींनी आवाहन
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे आहे. हा व्हिडिओ या प्रतिष्ठित इमारतीची झलक दाखवत आहे. माझी एक खास विनंती आहे की, हा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या आवाजाने (व्हॉईसओव्हर) शेअर करा, ज्यामुळे तुमचे विचार व्यक्त होतील. मी त्यापैकी काही रिट्विट करेन. “माय पार्लमेंट माय प्राईड (#MyParliamentMyPride) हा हॅशटॅग वापरायला विसरू नका,”.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेला व्हिडिओ अनेकांनी रिट्विट केला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शाहरुख खान, अक्षय खन्ना, अनुपम खेर यांनी आपला आवाज दिलाय.
What a magnificent new home for the people who uphold our Constitution, represent every citizen of this great Nation and protect the diversity of her one People @narendramodi ji. A new Parliament building for a New India but with the age old dream of Glory for India. Jai Hind!… pic.twitter.com/FjXFZwYk2T
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 27, 2023
शाहरुखने पंतप्रधानांना केला व्हिडिओ शेअर
अभिनेता शाहरुख यान याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आवाजाचा व्हिडिओ शेअर केला. शाहरुखने म्हटले आहे की, आपली राज्यघटना सांभाळणाऱ्यांसाठी नवीन घर’ असे वर्णन करून शाहरुख म्हणाला, ‘नवीन संसद भवन. आपल्या आशेचे नवीन घर, आपल्या संविधानाची काळजी घेणाऱ्यांसाठी एक घर, जिथे 140 कोटी भारतीय एक कुटुंब आहेत. हे नवीन घर इतकं मोठं होवो की त्यात प्रत्येक प्रदेशातील, प्रांतातील, गावातील, शहरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाला सामावून घेता येईल, या घराचे बाहू प्रत्येक जातीला, धर्माला प्रेम करेल. त्याचे डोळे इतके खोल असावेत की ते देशातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या समस्या पाहू शकेल, जाणून घेऊ शकेल…. पीएम मोदींनी हा व्हिडिओ रिट्विट केला आणि लिहिले, ‘सुंदर अभिव्यक्ती! नवीन संसद भवन हे लोकशाही शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक आहे…’
Proud to see this glorious new building of the Parliament. May this forever be an iconic symbol of India’s growth story. #MyParliamentMyPride pic.twitter.com/vcXfkBL1Qs
— Akshay Kumar (@akshaykumar) May 27, 2023
अक्षय कुमारनेही आवाज दिला
अक्षय कुमारने यानेही व्हॉईस ओव्हरसह शेअर केलेला व्हिडिओ पीएम मोदींनीही रिट्विट केला. अक्षय कुमारने नवीन संसद भवनाचे वर्णन ‘भारताच्या विकास कथेचे प्रतिकात्मक प्रतीक’ असे केले.
अनुपम खेर म्हणाले…
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनीही आपल्या आवाजात व्हिडिओ शेअर केला. त्याने म्हटले की, ‘ही इमारत केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी देशवासीयांच्या स्वप्नांचे स्थान आहे…ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची स्तुती आहे, हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे..’ पीएम मोदींनी ते रिट्विट केला आहे.
प्रख्यात कवी-गीतकार मनोज मुंतशीर यांनी नव्या संसदेचा व्हिडीओ शेअर करत, ‘नवीन संसद भवन माझ्या नजरेतून अशी दिसते!’ त्यांच्या ट्विटला रिट्विट करत पीएम मोदींनी लिहिले की, ‘नवीन संसद भवनाबद्दल तुमच्या भावना प्रत्येकाच्या मनात उत्साह आणि उत्साहाने भरतील.’ याशिवाय पीएम मोदींनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अनेक सामान्य लोकांच्या आवाजातील व्हिडिओ देखील शेअर केले.
हे ही वाचा
संसद भवनाचे उद्घाटन, विरोधकांपेक्षा समर्थनार्थ आले जास्त पक्ष, किती जणांनी दिला पाठिंबा वाचा
862 कोटी रुपयांचा खर्च झालेला नवीन संसद भवन तयार, कोण आहे आर्किटेक्ट बिमल पटेल