गळ्यातील वरमालाही काढल्या नव्हत्या, नवरदेव-नवरीचा अवघ्या काही तासात मृत्यू; जिथे जल्लोष झाला त्याच मांडवात मातम

लग्नाच्या काही तासातच नवरदेव आणि नवरीचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला अन् त्यात नवरदेव नवरीचा मृत्यू झाला. दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

गळ्यातील वरमालाही काढल्या नव्हत्या, नवरदेव-नवरीचा अवघ्या काही तासात मृत्यू; जिथे जल्लोष झाला त्याच मांडवात मातम
newly married couple Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 8:12 AM

नालंदा : ढोल ताशाच्या गजरात नवरा नवरीची मिरवणूक काढण्यात आली. वाजतगाजत त्यांना मंडपात आणण्यात आलं. यावेळी नवरदेव आणि नवरीनेही ढोलाच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर विधीवत लग्न करून दोघे लग्नाच्या बंधनातही अडकले. एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून जन्मोजन्मी साथ देण्याची वचनेही दिली. भरपूर फोटोही काढले. लग्नाच्या पंगतीही उठल्या. नवरा आणि नवरीनेही एकमेकांना घास भरवला. त्यानंतर नवरीला निरोपही देण्यात आला. फुलांनी सजवलेल्या कारमध्ये बसून नवरा आणि नवरी आपल्या घराच्या दिशेने निघाले. तिच्या डोळ्यात स्वप्न होती. संसार फुलवण्याची… नवं आयुष्य जगण्याची… तोही सुंदर जोडीदार मिळाल्याने खूश होता. पण काळाला ते मंजूर नव्हतं. अवघ्या काही तासांचा अवकाश… या दोघांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला अन् ज्या मांडवात जल्लोष केला त्याच मांडवात मातम सुरू झाला.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील गिरियक पोलीस ठाणे परिसरातील पुरैनी गावाजवळ हा अपघात झाला. ज्या कारमधून नवरदेव आणि नवरी जात होती. त्या कारला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. त्यात नवरदेव आणि नवरीचा जागीच मृत्यू झाला. तर नवरदेवाचा भावोजी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ट्रॅक्टरसहीत फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

असा झाला अपघात

सतौआ गावचे रहिवासी कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी (वय 20)चा विवाह नवादाच्या महराना गावातील श्याम कुमार (वय 27) याच्याशी झाला होता. लग्नानंतर शनिवारी दुपारी पुष्पाला निरोप देण्यात आला. इनोव्हा कारमध्ये बसून श्याम आणि पुष्पा बसले होते. त्यांच्यासोबत श्यामचा भावोजीही होता. महारानाकडे हे नवदाम्प्त्य निघालं होतं.

married couple

married couple

दुपारी 3 ते 4 च्या सुमारास त्यांची गाडी पुरैनी गावच्या जवळ आळी. त्याचवेळी वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर वेगाने आला आणि त्याने कारला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कार रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला अन् श्याम आणि पुष्पाचा जागीच मृत्यू झाला. यात श्यामचा भावोजी आणि कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

ट्रॅक्टर चालक फरार

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. श्यामच्या भावोजीला विम्स रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जात आहे.

रडारड आणि शोक

लग्न होऊन काही तासही झाले नाही. नवरा-नवरी गळ्यात वरमाला घालूनच आपल्या गावाकडे निघाले होते. तितक्यात अपघात झाला आणि दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वर आणि वधूकडील मंडळींना धक्का बसला. नातेवाईक आणि संपूर्ण गावालाच हा धक्का बसला. ज्या मांडवात काही तासांपूर्वी जल्लोष झाला त्याच मांडवात रडारड आणि आक्रोश सुरू झाला. या प्रकरणी आरोपीला पकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.