Odisha Train Accident : ट्रेन नंबर 12841… 250 KM पर्यंत धावल्यानंतर रुळावरून घसरली; 288 जणांचा जागीच मृत्यू

रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता आर्मी आणि एअरफोर्सची टीमही आली आहे. ओडिशा सरकारची स्पेशल रेस्क्यू टीमही बचाव कार्यात मदत करत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 60 रुग्णवाहिका आणि काही बसेस तैनात करण्यात आल्या आहेत.

Odisha Train Accident : ट्रेन नंबर 12841... 250 KM पर्यंत धावल्यानंतर रुळावरून घसरली; 288 जणांचा जागीच मृत्यू
Odisha Train AccidentImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 10:40 AM

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन ट्रेनचा विचित्र अपघात झाला आहे. बहनागा स्टेशनजवळ हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात 288 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोरोमंडल पश्चिम एक्सप्रेसही पश्चिम बंगालमध्ये कोलकाताच्या हावडा स्टेशन आणि तामिळनाडूच्या चेन्नई दरम्यान धावते. या अपघातानंतर एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार रेल्वे स्टेशनपासून चेन्नई सेंट्रल पर्यंत जाते. ही ट्रेन 1959 किलोमीटरचं अंतर 25 तासात कव्हर करते. शुक्रवारी कोरोमंडल ट्रेन शालीमार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 पासून 10 मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी 3.30 वाजता निघाली होती. त्यानंतर काही मिनिटातच ट्रेनने टाईम कव्हर केला. त्यानंतर 253 किमी लांब बाहानगा बाजार रेल्वे स्थानका जवळ अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

5 तासात कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर ट्रेन गेली

3.36 PM: संतरागाची जंक्शन 5.00 PM: खडगपूर जंक्शन 6.30 PM: बालासोर 6.47 PM: नीलगिरी रोड 6.52 PM: खंतरापारा 6.56 PM: पंपाना 8.30 PM: बाहानगा बाजार

रेल्वेचे हेल्पालाईन नंबर

हावड़ा- 033 – 26382217 खडगपूर- 8972073925, 9332392339 बालासोर- 8249591559, 7978418322 शालीमार (कोलकाता) – 9903370746 रेल्वे मदत- 044- 2535 4771

सर्व काही अस्तव्यस्थ

या अपघातानंतर सर्व काही अस्तव्यस्त झालं आहे. रेल्वेच्या डब्यातील परिस्थिती पाहून तर काळीज हेलावून जातं. रेल्वेच्या डब्ब्यात खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, कपडे, चप्पल, बूट आमि एमर्जन्सी अलार्म सर्व काही अस्तव्यस्त पडलेलं आहे. या रेल्वेत अजूनही लोक अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

जखमींसाठी रक्ताची सोय

दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आळी आहे. जखमींना रक्त मिळावं म्हणून लोकांनी रक्तदान केलं आहे. बालासोरमध्ये रात्रभर लोक रक्तदान करत होते. आतापर्यंत 500 यूनिट रक्त डोनेट करण्यात आलं आहे. तसेच 900 यूनिट रक्त स्टॉकमध्ये आहे. त्यामुळे जखमींना त्याचा फायदा होणार आहे.

60 रुग्णवाहिका, बसेस आणि चार हॉस्पिटल

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेस दिले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता आर्मी आणि एअरफोर्सची टीमही आली आहे. ओडिशा सरकारची स्पेशल रेस्क्यू टीमही बचाव कार्यात मदत करत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 60 रुग्णवाहिका आणि काही बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच चार रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहे. अपघातात दगावलेल्यांमध्ये सर्वाधिक लोक पश्चिम बंगालमधील आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.