Omicron : भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 415 वर, महराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे.

Omicron : भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 415 वर, महराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद
ओमिक्रॉन
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:11 AM

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 108, दिल्लीमध्ये 79, गुजरातमध्ये 43 , तेलंगाणा 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34, कर्नाटक 31, राजस्थानमध्ये 22, हरयाणा 4, ओडिशा 4, आंध्र प्रदेश 4 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 3, उत्तर प्रदेश 2, चंदीगढ 1, लडाख1, उत्तराखंडमध्ये 1 रुगणाची नोंद झाली आहे.

115 रुग्ण कोरोनामुक्त

देशात 415 ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झालीय मात्र देशातील 115 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 42, दिल्लीमध्ये 23, गुजरातमध्ये 05, केरळमध्ये 1, कर्नाटक 15, राजस्थानमध्ये 19, हरयाणा 2, आंध्र प्रदेश 1 , जम्मू काश्मीर 3, पश्चिम बंगाल 1, उत्तर प्रदेश 2, लडाख1 येथील रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत ओमिक्रॉनचे 11 नवे  रुग्ण

मुंबई महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनच्या 11 नव्या रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली आहे. मुंबईतील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. त्यापैकी 19 जणांना बरं झाल्यानं डिस्चार्ज देण्या आला आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्यांना सूचना दिल्या आहेत

>> विशेषत: येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर रात्री कर्फ्यू लावा, मेळाव्यावर बंदी घाला. कोरोनाचे प्रमाण वाढत असताना कंटेनमेंट आणि बफर झोन निश्चित करा.

>> चाचणी आणि पाळत ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चाचण्या केल्या पाहिजेत. घरोघरी केस शोधण्याची आणि आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवायला हवी.

>> चाचणी आणि सर्वेलांस कडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चाचण्या केल्या पाहिजेत. डोर टू डोर केस सर्च आणि आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवायला हवी.

>> रुग्णालयांमध्ये खाटा, रुग्णवाहिका आणि आरोग्य उपकरणे वाढवण्यावर भर दिला पाहिजे. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवला पाहिजे. 30 दिवसांसाठी औषधांचा साठा करा.

>> अफवा पसरू नयेत म्हणून सतत माहिती दिली जावी, राज्यांनी दररोज पत्रकार परिषद आयोजित केली पाहिजे.

>> राज्यांनी 100% लसीकरणावर भर दिला पाहिजे. दोन्ही डोस सर्व वयस्करांना दिले जातील याची खात्री करण्यासाठी घरोघरी मोहीम राबवावी.

इतर बातम्या:

Omicron : राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण, नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Corona Omicron New Guidelines : ओमिक्रॉनचं संकट, मुंबईसह राज्यात कोरोना दुप्पट ; ठाकरे सरकार ॲलर्ट, आज नवी नियमावली जाहीर होणार

Omicron cases reach to 415 in India reported by Union health ministry Maharashtra have highest number patient

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.