Omicron India : ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह! तर नियम मोडणाऱ्या दुसऱ्यावर गुन्हा दाखल

ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना(Corona)च्या नवीन प्रकाराची लागण झालेला डॉक्टर बरा झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बंगळुरूमध्ये राहणारा हा डॉक्टर भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या दोन प्रकरणांपैकी एक होता. त्याचवेळी, पोलिसांनी दुसऱ्या रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे, जो दक्षिण आफ्रिके(South Africa)चा रहिवासी होता आणि प्रशासनाला न सांगता दुबईला गेला होता.

Omicron India : ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह! तर नियम मोडणाऱ्या दुसऱ्यावर गुन्हा दाखल
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 5:23 PM

बंगळुरू : बंगळुरू(Bengaluru)मध्ये ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना(Corona)च्या नवीन प्रकाराची लागण झालेला डॉक्टर बरा झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बंगळुरूमध्ये राहणारा हा डॉक्टर भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या दोन प्रकरणांपैकी एक होता. त्याचवेळी, पोलिसांनी दुसऱ्या रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे, जो दक्षिण आफ्रिके(South Africa)चा रहिवासी होता आणि प्रशासनाला न सांगता दुबईला गेला होता.

परवानगी नाही मूळ गुजराती असलेला हा रुग्ण संक्रमित झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आला होता. मात्र प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता तो दुबईला गेला. दुसरीकडे, जो डॉक्टर ओमिक्रॉननं संक्रमित झाला होता, तो पुन्हा पॉझिटिव्ह आल्याचं बंगळुरू महापालिकेनं म्हटलं आहे. संबंधित डॉक्टर आयसोलेशनमध्ये आहे. अजून त्यामध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. लसींचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. शिवाय कोणताही प्रवास मागील काळात केलेला नाही.

विविध कलमान्वये गुन्हा दुसरीकडे गुजराती मूळ असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकावर गुन्हा दाखल केला आहे. क्वारंटाइनच्या नियमांचं उल्लंघन त्यानं केलं आहे. ज्या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलं होतं, तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या परवानगीविना तो दुबईला गेला. कर्नाटकातील महामारीसंबंधीच्या विविध कलमान्वये त्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.

खासगी लॅबमधली टेस्ट निगेटिव्ह २० नोव्हेंबरला संबंधित व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन देशात आली. बंगळुरूमध्ये त्याची स्क्रिनिंग आणि चाचणी करण्यात आली. 20 नोव्हेंबरला हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्यानंतर तो पॉझिटिव्ह आला. 22 नोव्हेंबरला त्याचं सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी घेण्यात आलं. रुग्णानं खासगी लॅबमध्ये टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याने 27 नोव्हेंबरला चेक आऊट केलं आणि दुबईला गेला.

देशभरात काय स्थिती? जगभरात 38 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. अजून कोणाच्याही मृत्यूचं वृत्त नाही. तर देशभरात 20हून जास्त प्रकरणं समोर आलीत. महाराष्ट्रात 10, राजस्थानात 9 कर्नाटक 2 तर दिल्ली आणि गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळून आलाय.

ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग सर्वाधिक; फेब्रुवारीमध्ये येणार तिसरी लाट, …तर दररोज आढळणार एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण?

Omicron : ख्रिसमसच्या तोंडावर गोव्याला धडकी, ओमिक्रॉनचे 5 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ

डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला तरीही राष्ट्रवादी बेफिकीर, कल्याणमधील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.