ऑस्ट्रेलियातून आला, तीन दिवस हनीमून… त्यानंतर नवऱ्याने असं काही केलं की…
उत्तर प्रदेशातील ज्योती शुक्ला हिची ऑनलाईनद्वारे भेटलेल्या अनिकेत शर्माशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. परंतु लग्नानंतर अनिकेतने ज्योतीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. अनिकेत आधीच विवाहित असल्याचे तिला ऑस्ट्रेलियात जाऊन कळले. त्यामुळे ज्योतीने अयोध्या पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि अनिकेतवर गुन्हे दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील एका तरुणीला ऑनलाईन लव्ह स्टोरी प्रचंड महागात पडलीय. कोरोना महामारीच्या काळातील ही लव्ह स्टोरी आहे. 2020मध्ये लॉकडाऊनच्या काळात अयोध्येत राहणारी ज्योती शुक्ला ही लुडो खेळायची. ऑनलाईन ज्युडो खेळत असताना तिची ओळख सिम्मी नावाच्या मुलीशी झाली. त्यांच्यात चांगली मैत्रीही जमली. पण काही दिवसानंतर ज्योतीला एक मेसेज आला. सिम्मीचा मृत्यू झाल्याचा हा मेसेज होता.
सिम्मीच्या आयडीवरून एक तरुण बोलत होता. माझं नाव अनिकेत शर्मा आहे. सिम्मीचा आयडी आता मी चालवतोय. त्यानंतर ज्योतीची अनिकेतशी मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांना फोन नंबर एक्सचेंज केले. अनिकेतने आपल्या एक दिवस अचानक प्रपोज केल्याचा ज्योतीचा दावा आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, असा मेसेज त्याने पाठवला होता. ज्योतीही त्याला पसंत करायची. त्यामुळे तिने त्याला आधी त्याच्या कुटुंबाची माहिती विचारली.
लग्नाला कोणीच नाही
त्यावर त्याने मी पंजाबच्या नवांशहर येथील मोहन नगरचा राहणार आहे, असं सांगितलं. अनिकेतने ज्योतिला विश्वासात घेतलं. त्यामुळे तिही लग्नाला तयार झाली. त्यानंतर अनिकेत तिला भेटायला आले. 6 मे 2023 रोजी दोघांचे पार्वती मॅरेज लॉनमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झालं. ज्योतीचे नातेवाईक या लग्नात उपस्थित होते. पण अनिकेतच्या कुटुंबातील कोणीच या लग्नात नव्हतं. मी ऑस्ट्रेलियात जॉब करतो. त्यानंतर मी तुला सासरी घेऊन जाईल, असं अनिकेत म्हणाला.
तीन दिवस हनीमून
त्यानंतर तीन दिवस हनीमूनसाठी ते अयोध्येला आले होते. लग्नानंतर 7 मे 2023 रोजी दोघेही अयोध्येतील रामायण हॉटेलात थांबले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मह्णजे 8 मे 2023 रोजी दोघेही अयोध्या जनपदाच्या रॉयल हेरिटेज हॉटेलात थांबले. तिसऱ्या दिवशी 9 मे 2023 रोजी अनिकेतने त्याला ऑफिसच्या कामासाठी ऑस्ट्रेलियात जावं लागणार असल्याचं ज्योतिला सांगितलं. त्यानंतर तो त्याच दिवशी ऑस्ट्रेलियासाठी निघाला. अनिकेत ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर त्याचं ज्योतीशी बोलणं होतच होतं. काही दिवसानंतर ज्योतीने त्याच्याकडे जाण्याचा हट्टच धरला. पण अनिकेत त्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यामुळे दोघांचेही फोनवर कडाक्याचे भांडण व्हायचे.
अनिकेतने पाच लाख रुपये मागितले
ज्योतीने पोलिसांमध्ये तक्रार केली. तिने पोलिसांना सांगितलं की, अनिकेतने नंतर नंतर पाच लाख रुपये मागायला सुरुवात केली. पैसे मिळत नसल्याने तो ज्योतीला सोबत ठेवायला तयार नव्हता. चार महिने हे असंच सुरू होतं. 19 सप्टेंबर 2023 रोजी ज्योती टुरिस्ट व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियात अनिकेत राहत होता त्या पत्त्यावर पोहोचली. तिथे गेल्यावर अनिकेतचा पर्दाफाश झाला. ऑस्ट्रेलियात गेल्यावर अनिकेत विवाहित असल्याचं तिला कळलं. त्याचे आईवडील पंजाबमध्ये राहत असल्याचंही समजलं.
आमचा घटस्फोट झाला
एवढंच नव्हे तर अनिकेत आपल्या कुटुंबीयांना भेटणअयासाठी पंजाबला नेहमी जात होता. जेव्हा ज्योतीने अनिकेतची तक्रार करण्यासाठी त्याच्या आईवडिलांना फोन केला तेव्हा त्यांनी ज्योतीलाच उलट शिवीगाळ केली. त्यानंतर ज्योती पंजाबला अनिकेतच्या घरी गेली. तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला शिवीगाळ करत मारहाण करून तिथून पळवून लावलं. त्यानंतर ज्योतीने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनिकेत आणि त्याची बायको किटी शर्मा यांनी पंजाबी भाषेत एक बनावट तलाकनामा तयार केला आणि आमचा तलाक झालेला आहे. तू कायदेशीर कारवाई करू नको, असं ज्योतिला सांगितलं.
ऑस्ट्रेलियात टॉर्चर
किटीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्योती ही अनिकेत सोबत ऑस्ट्रेलियाला गेली. ऑस्ट्रेलियात गेल्यावर ज्योतीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. अनिकेत ऑस्ट्रेलियात रोज ज्योतीला मारायचा. तिला खोलीत डांबून ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियातून आल्यावर तिने अयोध्या पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अनिकेतच्या विरोधात मारहाण, हुंडाबळी आणि 420 गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.