कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकच उपाय, देशव्यापी लॉकडाऊन करा; राहुल गांधी यांची मागणी
देशातील कोरोनाचं संकट दिवसे न् दिवस वाढत आहे. (Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi)
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचं संकट दिवसे न् दिवस वाढत आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. (Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. केंद्र सरकार परिस्थिती समजून घेत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच त्यावर पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक लोकांना प्राणास मुकावे लागत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
लसीकरण धीम्यागतीने
राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात लॉकडाऊन करण्यास विरोध केला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा गरीबांना सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. लॉकडाऊनमुळे व्हायरसला हरवलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. लसीकरण आणि कोरोना रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून राहुल यांनी केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे. लसीकरण अत्यंत धीम्यागतीने होत असल्याबद्दलही त्यांनी सोमवारी केंद्रावर टीका केली होती.
केंद्र सरकार अपयशी
त्यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यातही त्यांनी सरकारव टीका केली होती. केंद्र सरकार सुरुवातीपासूनच कोविडचा संसर्ग रोखण्यात अपयशी झाली आहे. अनेकदा इशारे देऊनही केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात पावलं उचलली नाहीत, असं राहुल यांनी म्हटलं होतं. केंद्राने राज्यांवर लॉकडाऊनचा निर्णय सोपवला आहे. हा हात झटकण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती. (Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi)
GOI doesn’t get it.
The only way to stop the spread of Corona now is a full lockdown- with the protection of NYAY for the vulnerable sections.
GOI’s inaction is killing many innocent people.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2021
संबंधित बातम्या:
Corona Crisis | देशात कोरोनाचा कहर, 15 दिवसात 50 लाख बाधितांची वाढ
बंगालनंतर भाजपला उत्तर प्रदेशातही झटका; पंचायत निवडणुकीत अखिलेशच्या सपाचा बोलबाला
Maharashtra Coronavirus LIVE Update : राहुल गांधींची संपूर्ण लॉकडाऊनची मागणी
(Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi)