ताजमहालाचे रहस्य उलगडणार?, ताजमहालात अनेक दशकांपासून बंद असलेल्या २० खोल्या उघडा, हायकोर्टात याचिका, मंगळवारी सुनावणी
ताजमहाल हा तेजो महाल असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून, याप्रकरणी सत्य संशोधन समिती गठित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यानिमित्ताने ताज महालात शिवमंदिर आहे का की ताजमहाल हा ताजमहालच आहे, याचीही स्पष्टता येईल, असा दावाही करण्यात आला आहे.
आग्रा – जगातील सात आश्चर्यांपैकी (Seven wonders)एक असलेल्या, ताजमहालात (Taj mahal)खरंच शिवमंदिर (Shiv mandir) आहे का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात ताजमहालात बंद असलेल्या २० खोल्या उडून तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय पुपरातत्व विभागाने यासाठी पावले उचलावीत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ताजमहालात जुन्या मूर्ती आणि भारतीय शिलालेख आहेत का, हेही यानिमित्ताने स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या अयोध्या जिल्ह्याचे माध्यम प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. १० मे म्हणजेच मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
#HinduMahaSabha Petition filed in Lucknow court. Petition sought survey by @ASIGoI of 22 rooms of “#TajoMahal“, which have been locked since several decades Cc :- @OfficeOfDMAgra @agrapolice @Onaesimushttps://t.co/hFm7jkLOXZ
हे सुद्धा वाचा— Hindu Mahasabha (@HMSKTK) May 8, 2022
तथ्य संशोधन समिती गठित करण्याची मागणी
ताजमहाल हा तेजो महाल असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला असून, याप्रकरणी सत्य संशोधन समिती गठित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. यानिमित्ताने ताज महालात शिवमंदिर आहे का की ताजमहाल हा ताजमहालच आहे, याचीही स्पष्टता येईल, असा दावाही करण्यात आला आहे.
त्या २० खोल्यांची तपासणी करा
सत्य संशोधन समितीमारफ्त बंद असलेल्या ताजमहालातील २० खोल्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी हिंदू मूर्ती, शिलालेख वा धर्मग्रथांतील काही पुरावे आहेत का, हेही यानिमित्ताने स्पष्ट होईल, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. पुरातत्व विभागाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
याचिकेत इतिहासकारांचाही दाखला
ताजमहालाच्या चार मजली बांधकामात वरती आणि खालच्या बाजूला २० खोल्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे बंद आहेत. या खोल्यांत शिवमंदिर असल्याचे पीएन ओक आणि इतर इतिहासकारांचा दावा असल्याचेही सांगण्यात आले आहे. या खोल्या ताजमहाल बांधल्यापासून कधी उघडल्यात की नाही, याचीही माहिती कुणाकडे उपलब्ध नाहीये.
या ठिकाणी शिवपूजा करण्याचाही झाला होता प्रयत्न
ताजमहाल हा तेजोमहल असल्याचा दावा सातत्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येतो आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी श्रावणात ताजमहालात शिव आरती करण्याचाही प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी परमहंसाचार्य यांनीही ताजमहाल हा तेजोमहल असल्याचा दावा केला होता. ताजमहालात शिवपूजा करण्याबाबत त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेवरुन वाद झाला, त्यांना प्रवेश ऱोखण्यात आला, त्यानंतर त्यांना पोलिसांच्या सुरक्षेत पुन्हा अयोध्येला पाठवण्यात आले होते.
>