Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकातील ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार, कोर्टाची परवानगी; येडियुरप्पांना झटका

कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. (Operation Kamala! Karnataka HC vacates stay, allows probe against CM Yediyurappa)

कर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस'ची चौकशी होणार, कोर्टाची परवानगी; येडियुरप्पांना झटका
BS Yediyurappa
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 6:16 PM

बेंगळुरू: कर्नाटकातील बहुचर्चित ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्यासमोरी अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Operation Kamala! Karnataka HC vacates stay, allows probe against CM Yediyurappa)

जनता दल सेक्युलरचे नेते नगन गौडा यांचे चिरंजीव शरण गौडा यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

ऑडिओ क्लिपने खळबळ

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांनी ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून षडयंत्र रचल्याचा येडियुरप्पा यांच्यावर आरोप आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वडिलांना राजीनामा द्यायला सांग किंवा पक्ष सोडायला सांग असं येडियुरप्पा एका आमदाराच्या मुलाला सांगत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

असं पाडलं सरकार

2019मध्ये आमचं सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचलं होतं, असा दावा काँग्रेस आणि जेडीएसने केला होता. त्याप्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणीही या दोन्ही पक्षांनी केली होती. 2018मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2019मध्ये सत्ताधारी आघाडीतील काही आमदार भाजपला येऊन मिळाले होते. त्यामुळे राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्यात आलं होतं. ऑपरेशन लोटसद्वारेच आमचं सरकार पाडल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला होता. तर येडीयुरप्पा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 2018मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. राज्यात बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे.

पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. काँग्रेस-जेडीएसचे काही आमदार फुटल्याने येडियुरप्पा यांना राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. (Operation Kamala! Karnataka HC vacates stay, allows probe against CM Yediyurappa)

संबंधित बातम्या:

कर्नाटकात नवा ट्वीस्ट, विधानसभा अध्यक्षांकडून 3 आमदारांचं निलंबन   

कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं ‘मिशन कमळ’ यशस्वी   

दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं, पण कुमारस्वामींचं दोन्हीही वेळा ‘बॅड लक’  

(Operation Kamala! Karnataka HC vacates stay, allows probe against CM Yediyurappa)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.