Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी विरोधी पक्षनेत्यांची बैठक, सरकारला घेरण्याची रणनीती ठरवणार
राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी संध्याकाळी राज्यसभेतील सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे.
नवी दिल्लीः संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी सोमवारी संसदेत बैठक घेण्याचे नियोजन विरोधी पक्षनेत्यांनी केले आहे. या बैठकीत कृषीविषयक तीन कायदे आणि वाढती महागाई व इतर ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी दोन्ही सभागृहात रणनीती निश्चित केली जाणार आहे.
29 नोव्हेंबरला सुरू होणारे हिवाळी अधिवेशन, संसदेच्या कामकाजापेक्षा राजकीय चर्चांमुळे जास्त तापेण्याची शक्याता आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुका पाहता सरकार आणि विरोधक एकमेकांवर हल्ला-बोल करणार, हे नक्की.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आणि खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर TV9ला सांगितले की, आमची रणनीती आहे की संसदेत संपूर्ण विरोधी पक्ष आणि समविचारी पक्षांच्या वतीने एकत्र सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. मतभेद नसावेत, कारण केंद्र सरकारच्या अपयशामुळे आजकाल सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आणखी एक विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा खासदार म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक 2021 वर चर्चा करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षभरात आंदोलक शेतकऱ्यांना काय सहन करावे लागले आणि सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारू शकते यावर भर देऊ.
Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu calls a meeting of Leaders of various political parties tomorrow, 28th November, ahead of the Winter Session of Parliament. pic.twitter.com/oqaD8BwXsb
— ANI (@ANI) November 27, 2021
आणखी कोणते मुद्दे उचलणार
राज्यसभा खासदार पुढे म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षनेत्याला केवळ कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक 2021 वर चर्चा करायची नाही, तर चीनची आक्रमकता, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, बेरोजगारी आणि लखीमपूर खेरीच्या घटनेवरही चर्चा करायची आहे, जिथे आठ लोक मारले गेले. आणि विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी सरकार देईल अशी अपेक्षा आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनाचा अजेंडा आणि महत्त्वाच्या कामांवर चर्चा करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी संसदेत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी संध्याकाळी राज्यसभेतील सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे.
इतर बातम्या