अनाथ मुलगा झाला या मतदारसंघाचा नाथ, आमदार झाल्यानंतर बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष

कर्नाटकात काँग्रेसचे १३६ आमदार निवडून आले आहेत. ज्यापैकी एक आमदार अधिक चर्चेत आला आहे. काय आहे कारण. कोण आहे तो कर्नाटकचा सर्वात तरुण आमदार.

अनाथ मुलगा झाला या मतदारसंघाचा नाथ, आमदार झाल्यानंतर बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 4:40 PM

बंगळुरु : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे १३६ आमदार निवडून आलेत. पण या १३६ आमदारांमध्ये एक आमदार असाही आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. या आमदाराचं नाव आहे प्रदीप ईश्वर. ते ३८ वर्षांचे आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कर्नाटक राज्याचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांचा पराभव करत आता विधीमंडळात प्रवेश केला आहे. ते कर्नाटकमधील सर्वात तरुण आमदार बनले आहेत.

चिक्कबल्लापूर मतदारसंघातून निवडून आलेले प्रदीप ईश्वर म्हणाले की, ‘एका गरीब कुटुंबातील एका अनाथ मुलाला काँग्रेस पक्षाचे तिकीट दिले आणि एकाही पैशाशिवाय निवडणूक जिंकली. यावरून लोकशाही अजूनही जिवंत असल्याचे दिसून येते. मला काँग्रेस पक्षाचे आभार मानायचे आहेत.’

राज्यातील सर्वात शक्तिशाली मंत्री आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे विश्वासू सहकारी के सुधाकर यांचा प्रदीप ईश्वर यांनी १०,६४२ मतांनी पराभव केला. प्रदीप ईश्वर हे सरदर्शन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चालवतात. ही संस्था वैद्यकीय आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देते. ईश्‍वर यांची पत्नीही याच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात.

प्रदीप ईश्वर यांनी आपल्या भाषणांनी लोकांची मने जिंकली. त्यांची भाषणे सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. त्यांचे एक भाषण इतरे व्हायरल झाले, ज्यामध्ये त्यांनी अनाथ आणि 12वी पास गरीब व्यक्ती म्हणून स्वत:चे वर्णन केले.

वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते चर्चेत आले. स्थानिक दूरचित्रवाहिनीचा अँकर म्हणून चिक्कबल्लापूरमध्ये लोकप्रियता मिळवली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.