Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये ‘लोन वुल्फ अटॅक’ करण्याच्या तयारीत, मोठा कट उधळला

दिल्ली पोलिसांनी मोहम्मद अश्रफला अटक केलं आहे. त्याच्या अटकेनंतर पाकच्या कुरापत्या पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत. अशरफ राजधानी दिल्ली तसेच काश्मीर घाटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत होता. अशरफच्या संपर्कात अजूनही अनेक लोक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये 'लोन वुल्फ अटॅक' करण्याच्या तयारीत, मोठा कट उधळला
MOHAMMAD ASHRAF
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 5:45 PM

नवी दिल्ली : दिल्लीमधील लक्ष्मीनगर येथून पाकिस्तानमधील एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तो राजधानी दिल्ली तसेच काश्मीरमध्ये मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होता. मिळालेल्या माहितीनुसार तो मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तसेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्नदेखील केले होते. सध्या मात्र तो या महिलेपासून वेगळा राहत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अशरफ (Mohammad Ashraf) असून तो दिल्ली येथील स्लिपर सेल्सचा प्रमुख होता. भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे तसेच इतर सामान पुरवण्याचे त्याचे काम होते.

यमुना नदीच्या किनाऱ्यावर लपवले शस्त्र

दिल्ली पोलिसांनी मोहम्मद अश्रफला अटक केलं आहे. त्याच्या अटकेनंतर पाकच्या कुरापत्या पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत. अशरफ राजधानी दिल्ली तसेच काश्मीर घाटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत होता. अशरफच्या संपर्कात अजूनही अनेक लोक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने कालिंदी कुंज येथील यमुना नदीच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये शस्त्रे लपवून ठेवली होती. अशरफने राजधानी दिल्लीमध्ये लोन वुल्फ अटॅक करण्यासाठी कट रचत होता.

आरोपीने आरोप मान्य केले आहेत

सूत्रांच्या माहितीनुसार अशरफला अटक करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत जम्मू आणि काश्मीरमध्ये काही ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचण्यात आल्याचे त्याने मान्य केले आहे. असे असले तरी पोलीस या प्रकरणात पुरावे गोळा करण्याच प्रयत्न करत आहेत.

मौलाना असल्याची बतावणी करुन 15 वर्षांपासून वास्तव्य

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला अशरफ मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्य मौलाना म्हणून राहत होता. तो भारतात अनेक शहरांत यापूर्वी राहिलेला आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपीकडे आयएसआयचे अनेक फोन नंबर मिळालेले आहे. आयएसआयने अशरफला भारतात मोठा हल्ला करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच्या फोनवरुन जास्तीत जास्त VOIP कॉल्स आलेले आहेत. तसेच त्याच्या मोबाईल फोनमधून अनेक पाकिस्तानी मोबाईल नंबर मिळालेले आहेत.

लोन वुल्फ अटॅक काय असतो ?

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीने यमुना नदीच्या तिरावर त्याने वेगवेगळी शस्त्रे लपवली होती. मागील काही दिवसांत तो किती आणि कोणत्या लोकांना भेटला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच अटक केलेला अशरफ लोन वुल्फ अटॅक करण्याच्या तयारीत होता. दहशत माजवण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक तंत्र आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यात दहशतवादी एकटाच असतो. हल्ला करुन जास्तीत जास्त लोकांजा जीव घेण्याचा प्रयत्न लोन वुल्फ अटॅकमध्ये केला जातो. सध्या अशरफची चौकशी सुरु आहे.

इतर बातम्या :पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबरला ‘पीएम गती शक्ती योजना’ लाँच करणार, 16 मंत्रालय थेट एकाच प्लॅटफॉर्मवर

Corona Cases In Indi | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट

मेहबुबा मुफ्ती यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार, ‘ते’ ट्विट दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे, वकिलाचा दावा

(pakistani terror suspect Mohammad Ashraf arrested in delhi who planned to attack in delhi and jammu kashmir)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.