पाकिस्तानातून आलो, ISI ने 20 हजार दिले, उरीमध्ये नाल्यात लपलो, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे

दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या दहशतवाद्याला जिवंत पकडल्यानंतर त्याने आता धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानचा दहशतवादी अली बाबरला (Ali Babar Patra) जम्मू काश्मीरमधील उरी इथं जिवंत पकडण्यात आलं.

पाकिस्तानातून आलो, ISI ने 20 हजार दिले, उरीमध्ये नाल्यात लपलो, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे
Pakistani terrorist Ali Babar Patra
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 1:44 PM

श्रीनगर : दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या दहशतवाद्याला जिवंत पकडल्यानंतर त्याने आता धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानचा दहशतवादी अली बाबरला (Ali Babar Patra) जम्मू काश्मीरमधील उरी इथं जिवंत पकडण्यात आलं. त्याने आता भारतीय सुरक्षारक्षकांकडे पाकिस्तानची पोलखोल केली आहे. हत्यारं पुरवण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलो होतो, असं त्याने सांगितलं. ISI ने पैसे दिल्यामुळेच आपण या कारवायांसाठी तयार झालो. इतकंच नाही तर पाकिस्तानी सैन्याने आपल्याला ट्रेनिंग दिलं असे धक्क्दायक खुलासे अली बाबरने केले आहेत.

मला 20 हजार रुपये अॅडव्हान्स मिळाले होते, याशिवाय माझ्या कुटुंबाला 30 हजार रुपये देण्यात आले होते. मला ISI ने पैसे पुरवले. पाकिस्तानमध्येच माझं ट्रेनिंग झालं, अशी कबुली अली बाबरने दिली.

अवघ्या 19 वर्षांचा जिवंत दहशतवादी

अली बाबर हा पाकिस्तानातील पंजाब प्रांताताली ओकारा इथला रहिवासी आहे. त्याचं वय अवघं 19 वर्ष आहे. पाकिस्तानातील हबीबुल्लाह खोऱ्यात त्याला दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण मिळालं. बाबरला पट्टन परिसरात हत्यारं पोहोचवण्याची जबाबबादी दिली होती. मात्र केवळ हत्यारं पोहोचवणं इतकीच त्याची जबाबदारी असू शकत नाही, तो अन्य दहशतवादी कारवायाही करण्याच्या तयारीत असू शकतो, अशी शंका भारतीय जवानांना आहे.

दहा दिवस लपला

अली बाबर हा गेल्या 10 दिवसांपासून उरी परिसरात लपून बसला होता. तो एका नाल्यात लपला होता. भारतीय सुरक्षा रक्षकांनी त्याला शोधून काढलं आणि जिवंत पकडलं. अली बाबर हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा असल्याची माहिती आहे. त्याच्याजवळ AK-47 रायफल आणि चीन-पाकिस्तान बनावटीचे अनेक ग्रेनेड होते.

दरम्यान, या सर्व कारवाईदरम्यान, अली बाबरचा एक सहकारी ठार झाला तर तीन भारतीय जवान जखमी आहेत.

LOC वर दहशतवाद्यांची चाहूल पाहून भारतीय सुरक्षा रक्षकांनी 18 सप्टेंबरपासून गस्त वाढवली आहे. आतापर्यंत 6 दहशतवाद्यांचा एन्काऊंटर झाला आहे.

संबंधित बातम्या  

मुंबई लोकलमध्ये घातपातासाठी ‘आऊटसोर्सिंग’, ATS च्या तपासात दहशतवादी कटाची धक्कादायक माहिती

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.