EXCLUSIVE ! संसदेतील घुसखोरांची सुटका कठीणच? सात मोठी कारणं ज्यामुळे पोलिसांनी कोठडी मागितली
दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांनी संसदेत घुसून धुडगूस घातला. त्यानंतर इतर दोन तरुणांनीही संसदेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी दिली. संसदेत आणि संसदेच्या बाहेर या तरुणांनी स्मोक कँडल फोडली. त्यामुळे पिवळा, लाल रंगाचा धूरच धूर झाला. या धुरामुळे खासदारांचे डोळे जळजळ करायला लागले. डोळ्यातून पाणी आलं. त्यामुळे काही खासदार तात्काळ जीवमुठीत घेऊन बाहेर पडले.
नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : संसदेत दोन जणांनी घुसखोरी करून जोरदार गोंधळ घातला. इतर दोघांनी संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. संसद आणि संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडण्यात आली. त्यामुळे पिवळा, लाल आणि पांढरा धूर निघाला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे. या सर्वांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. देशात अराजकता माजवण्याचा आरोप या पाचही जणांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या तरुणांचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याने शरणागती पत्करली आहे. त्यालाही पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची कोठडी दिली आहे. पोलिसांनी ललित झाबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. ललितला देशात अराजकता निर्माण करायची होती. ललितने त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे फोन जप्त केले होते. हे सर्व फोन त्याने जयपूर आणि दिल्लीच्या दरम्यान फेकून दिले. या फोनच्या माध्यमातून त्याने रचलेलं षडयंत्र उघड होऊ नये म्हणून त्याने ही खबरदारी घेतल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे.
चौघांसाठी वकिलाची नियुक्ती
शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलीस ललितला पटियाला हाऊस कोर्टात घेऊन गेले होते. कोर्टाने त्याला एक वकीलही दिला. वकील उमाकांत कटारिया हे त्याची बाजू मांडत आहेत. कटारिया इतर आरोपींचीही वकालत करणार आहे.
या आधारे कोठडी मागितली
सखोल आणि सविस्तर चौकशीसाठी, तसेच संसदेवरील सुनियोजित हल्ल्या मागचं षडयंत्र उघड करण्यासाठी कोठडी मागण्यात आली.
या षडयंत्रात आणखी कुणाचा सहभाग आहे याची माहिती घेण्यासाठी
हल्ल्याचा मागचा खरा हेतू जाणून घेण्यासाठी. तसेच या तरुणांचा एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का हे जाणून घेण्यासाठी.
षडयंत्राचा स्पष्ट अंदाज घेण्यासाठी या आरोपींना समोरासमोर बसवायचे आहे. त्यांचा मोबाईल फोन आणि त्यांची भेटण्याची जागा याची माहिती उघड व्हावी म्हणून कोठडी मागण्यात आली आहे.
ललित झाच्या फोनचा शोध घेण्यासाठी
आरोपी ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, त्या हॉटेलची माहिती घेण्यासाठी
हल्ल्याच्या मागची आर्थिक घेवाणदेवाण आणि फंडाची माहिती जाणून घेण्यासाठी