जमीन कमी पडली की काय? आकाशात भिडले, विमानात प्रवासी आणि क्रू मेंबरमध्ये ढिश्यूम ढिश्यूम; शेवटी विमान…
नवी दिल्लीहून लंडनच्या दिशेने निघालेल्या विमानात आज राडा झाला. क्रू मेंबर आणि प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे ए्अर इंडियाचं विमान अर्ध्या रस्त्त्यातून माघारी बोलावण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : तुम्ही अनेक प्रकारच्या माऱ्यामाऱ्या पाहिल्या असतील. अगदी लाठ्याकाठ्यांपासून ते धारदार शस्त्रांनी हल्ला करणाऱ्या मारामाऱ्या पाहिल्या असतील. अनेकांना रक्तबंबाळ झालेलं पाहिलं असेल. तुम्ही प्रवासात असताना रेल्वेत, बसमध्ये अहो एवढंच कशाला रिक्षा आणि टॅक्सीतही प्रवाशांची मचमच पाहिली असेल. क्षुल्लक कारणावरून झालेले झगडे पाहिले असेल. पण आकाशातील भांडण कधी पाहिलंय का? काय आश्चर्य वाटलं ना? पण ते खरं आहे. आज पहाटे आकाशात भांडण झालं. अगदी दोन गटात झालंय. त्यामुळे विमान माघारी बोलावण्यात आलं आहे. सध्या या आकाशातील भांडणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
त्याचं असं झालं… दिल्ली विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने लंडनसाठी उड्डाण घेतली होती. यावेळी एअर इंडियातील क्रू मेंबर आणि प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे विमानात एकच घबराट पसरली. काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तात्काळ विमान माघारी फिरवण्यात आलं. अर्ध्या रस्त्यावरून हे विमान दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आलं. या प्रकरणी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यता आली आहे. सर्व प्रवाशांना एअरपोर्टवर थांबवण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पहाटे पहाटे
एअर इंडियाचं (AI-111) या विमानाने आज पहाटे 6.35 वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच प्रवासी आणि क्रू मेंबरमध्ये वाद झाला. क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. त्यानंतर प्रकरण हाणामारीवर आलं. त्यामुळे हे विमान तात्काळ दिल्लीला परत आणण्यात आलं. दिल्लीत विमान लँड होताच क्रू मेंबर्सनी उपद्रवी प्रवाशांना पोलिसांच्या हवाली केलं. एअर इंडियाने या प्रवाशांच्या विरोधात तक्रार दिल्याचं सांगितलं जात आहे.
“Air India flight AI 111 scheduled to operate Delhi-London today returned to Delhi shortly after departure due to the serious unruly behaviour of a passenger on board. Not heeding to verbal and written warnings, the passenger continued with unruly behaviour including causing… pic.twitter.com/Lo9GXTlAlH
— ANI (@ANI) April 10, 2023
दोघांना मार लागला
दिल्लीहून लंडनच्या हिथ्रो विमानतळाकडे हे विमान झेपावलं होतं. मात्र, काही प्रवाशांनी विमानात हंगामा केल्याने विमान अर्ध्या रस्त्यातून माघारी बोलावण्यात आलं. दुपारी हे विमान पुन्हा लंडनच्या दिशेने रवाना होणार आहे. या प्रवाशांनी हुज्जत घातली तेव्हा त्यांना त्यांच्या वर्तनाबाबत इशारा देण्यात आला होता. पण त्यात काही बदल झाला नाही. ते प्रवासी अंगावर धावून आले. दोन क्रू मेंबर सदस्यांना किरकोळ मार लागला आहे. जखमी सदस्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांना पाहिजे ती मदत दिली जात आहे. प्रवाशांना त्रास झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तसेच लंडनला जाणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल केला आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.