Petrol Diesel Hike:पुन्हा पेट्रोल-डिझेल होणार महाग, रशियाकडून आता भारताला सवलतीच्या दरात कच्चे तेल मिळणार नाही, कच्चे तेल खरेदी महागणार
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या १३ आठवड्यांत चांगल्याच वाढल्या आहेत. रुपयाही डॉलरच्य तुलनेत चांगलाच घसरला आहे. याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम येत्या काही काळात देशात पेट्रोल-डिझेलच्या भडक्याच्या स्वरुपात होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – येत्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel hike) दरांचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. याचे कारण आहे रशिया. रशियाने यापुढे भारताला स्वस्त दरात क्रूड ऑईल (Crude oil)देण्यास नकार दिला आहे. भारतातील दोन महत्त्वाच्या तेल कंपन्या बीपीसीएल आणि एपपीसीएल (BPCL and HPCL)या दोन्ही कंपन्यांची गेल्या काही दिवसांपासून रशियन कंपनी रोसनेफ्टशी सुरु असलेली बातचित असफल ठरली आहे. या एकूणच प्रकरणावर रॉयटर न्यूज एजन्सीने एक वृत्तही प्रसिद्ध केले आहे. हे सगळे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 13 आठवड्यांत चांगल्याच वाढल्या आहेत. रुपयाही डॉलरच्य तुलनेत चांगलाच घसरला आहे. याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम येत्या काही काळात देशात पेट्रोल-डिझेलच्या भडक्याच्या स्वरुपात होण्याची शक्यता आहे.
क्रूड ऑईल 124 डॉलर प्रति बॅरल
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या भाववाढीचा परिणाम थेट देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होतो. गुरुवारी ब्रेंट क्रूड 124 डॉलर्स प्रति बॅरल इतक्या मोठ्या किमतीने विकले गेले. गेल्या 13 आठवड्यातील हा सर्वाधिक दर आहे. कच्च्या तेलाच्या किमती महागल्याने तेल कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. हा तोटा कमी करण्यासाठी देशात इंधानांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात य़ेते आहे. असा परिस्थिीत जर रशियाकडून स्वस्तात मिळणारे कच्चे तेलही मिळायचे बंद झाले तर इंधानाच्या दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केवळ आयओसीसोबत 6 महिन्यांचा करार
आत्ता सध्या केवळ इंडियन ऑईल याच कंपनीचा, रशियन कंपनीसोबत सहा महिन्यांचा स्वस्तात कच्चे तेल मिळण्याबाबतचा करार आहे. या करारानुसार इंडियन ऑईल कंपनी रशियातील कंपनीकडून दर महिन्याला 60 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करु शकणार आहे. याचसोबत 30 लाख बॅरल जास्त खरेदी करण्याचाही पर्याय आहे. या करारात मोठ्या चलनात पेमेंट करण्याची आवश्यकता आहे. ज्यात रुपये, डॉलर आणि युरोंचा समावशे आहे. व्यवहार करताना कोणती व्यवस्था उपलब्ध आहे, यावर हे ठरते. भआरत रशइयाकडून यूरल ग्रेड ऑईल खरेदी करते. मात्र आयओसीने आपल्या करारात सोकोल ग्रेड आणि ईएसपीओ ब्लेंड या कच्च्या तेलांचाही समावेश केला आहे.
रोसनेफ्टकडे जास्तीचे तेल उपलब्ध नाही
रोसनेफ्ट ही कंपनी इतर ग्राहाकांनाही कच्च्या तेलाचा पुरवठा करते. आत्ता त्यांच्याकडे असे जास्तीचे तेल उपलब्ध नाही, जे तेल ही कंपनी भारतातील कंपन्यांना विकू शकेल. भारतातील रिफायनरींना आता कच्च्य़ा तेलासाठी स्पॉट मार्केटमध्ये जावे लागेल, जिथे कच्चे तेल महाग मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही महत्त्वाच्या तेल कंपन्यांना 10 ते 20 लाख बॅरल तेल जुलैत मिळण्याची शक्यता आहे.
प्रतिबंध असतानाही कच्च्या तेलाच्या निर्यातीत रशिया यशस्वी
भारताशी असलेला करार रद्द केल्यामुळे, रशिया पाश्चिमात्य देशांच्या दबावानंतरही कच्च्या तेलाच्या निर्यातीत सफल राहिल्याचे दिसते आहे. आता रोसनेफ्ट इतरही मार्गांनी कच्चे तेल बाजारात आणत असल्याची माहिती आहे.
रुपया महाग झाल्याने कच्च्या तेलाची आयातही महागणार
गुरुवारी रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात अजून घसरण झाली आहे. सातत्याने रुपयाच्या होत असलेल्या घसरणीमुळे कच्च्या तेलाची आयातही देशाला महाग पडणार आहे.