Madhya Pradesh: पत्रकारासह आठ जणांची पोलीस ठाण्यात अर्ध नग्न परेड, मध्यप्रदेश पोलिसांवर छळवणुकीचा आरोप; काय आहे प्रकरण?
madhya pradesh: मध्यप्रदेशातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युट्यूब पत्रकारासहीत आठ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या सर्वांचे कपडे उतरवून त्यांना पोलीस ठाण्यात अर्धनग्न (MP Journalist Stripped) उभे केले.
भोपाळ: मध्यप्रदेशातील (madhya pradesh) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युट्यूब पत्रकारासहीत आठ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या सर्वांचे कपडे उतरवून त्यांना पोलीस ठाण्यात अर्धनग्न (MP Journalist Stripped) उभे केले. या घटनेचा फोटो व्हायरल झाला असून त्यामुळे पोलिसांविरोधात (police) तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी छळवणूक केल्याचा दावाही या तरुणांनी केला आहे. हा फोटो मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. थिएटर आर्टिस्ट नीरज कुंदर यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन केल्याच्या आरोपावरून या आठजणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला हटवण्यातक आलं असून या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षकामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचे चिरंजीव गुरु दत्त यांच्याविरोधात आक्षेपाहार्य विधान केल्याप्रकरणी नीरज कुंदर यांना अटक करण्यात आली होती. बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पत्रकार आणि सात अन्य लोकांना 2 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे.
फेक अकाऊंट तयार केले
थिएटर कलाकार नीरज कुंदर इंद्रावती नाट्य संस्थेचे संचालकही आहेत. त्यांनी भाजप आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांच्या मुलांची प्रतिमा डागाळणारं विधान केलं होतं. बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांनी हे विधान केलं होतं. ते वारंवार आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. नीरज कुंदर नावाच्या एका व्यक्तीने अनुराग मिश्रा नावाच्या व्यक्तीचं बनावट प्रोफाईल तयार केले होते असं चौकशीत समोर आलं होतं. 2 एप्रिल रोजी नीरजला कलम 419, 420 अंतर्गत अटक करण्यात आली होती, असं सीधी पोलीस ठाण्याचे इंचार्ज मुकेश सोनी यांनी सांगितलं.
पोलीस ठाण्याबाहेरच आंदोलन
नीरज यांच्या अटकेच्या निषेधार्थ युट्यूब जर्नालिस्ट कनिष्क तिवारी आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं. हे सर्वजण पोलीस आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी कपडे काढून त्यांना मारहाण केल्याचा पोलिसांवर आरोप आहे.
MP | Police station in-charge Kotwali Sidhi and a sub-inspector suspended and attached to the Police Lines in connection with the matter where a group of men, including a journalist & YouTuber, was seen only in their underwear inside a police station in a viral photo (in pic). pic.twitter.com/qgapFfo3HP
— ANI (@ANI) April 8, 2022
संबंधित बातम्या:
Rahul Gandhi: श्रीलंकेसारखं भारतातही सत्य बाहेर येईल; राहुल गांधी यांचा दावा
UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल