HoneyTrap : राजस्थानच्या महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न

हनीट्रॅप प्रकरणातील मास्टर माईंड अक्षत शर्मा आणि दिपाली या दोघांनी गुनगुनचे अश्लील व्हिडिओ काढले होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत गुनगुनला 28 जानेवारी रोजी हे दोघे गुनगुनला घेऊन मंत्री जाट यांना भेटण्यासाठी भीलवाडा येथील सर्किट हाऊसमध्ये गेले. मात्र त्या दिवशी मंत्र्यांची भेट होऊ शकली नाही.

HoneyTrap : राजस्थानच्या महसूल मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा डाव, मॅाडेलचा आत्महत्येचा प्रयत्न
मॉडेल गुनगुन उपाध्याय
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:31 PM

जयपूर : जोधपूर येथे काही दिवसापूर्वी एका मॅाडेलने हॉटेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान राजस्थानच्या महसूल मंत्री रामलाल जाट (Ramlal Jat) यांना हनीट्रॅपमध्ये (sex scandal) अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुनगुन उपाध्याय (19) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मॉडेलचे नाव आहे. अक्षत शर्मा उर्फ सागर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तो भीलवाडा येथील सुभाषनगरमधील रहिवासी आहे. अक्षतसह त्याच्या टोळीतील सदस्य असलेल्या उदयपूरची रहिवासी असलेल्या दिपाली आणि जील या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. गुनगुनला या टोळीने अडकवले होते. मॉडेलच्या माध्यमातून ही टोळी मंत्र्याला हनीट्रॅपमध्ये गुंतवणार होती. मॉडेल आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. (Plan to trap Rajasthan’s revenue minister in honeytrap, Model’s suicide attempt)

फक्त माझा चेहरा पहा असे वडिलांना सांगून गुनगुनने केला आत्महत्येचा प्रयत्न

गुनगुन ही जोधपूर शहरातील हॉटेल लॉर्ड्समध्ये रविवारी रात्री थांबली होती. आत्महत्या करण्यापूर्वी गुनगुनने आपल्या वडिलांना फक्त माझा चेहरा पहा असे फोन करुन सांगितलं. त्यानंतर हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत गुनगुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. गुनगुनच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून उंचावरुन पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला आहे. गुनगुनचे वडिल व्यापारी आहेत. आत्महत्येची माहिती वडिलांना दिल्यानंतर गुनगुनच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

गुनगुनचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला धमकावले

हनीट्रॅप प्रकरणातील मास्टर माईंड अक्षत शर्मा आणि दिपाली या दोघांनी गुनगुनचे अश्लील व्हिडिओ काढले होते. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत गुनगुनला 28 जानेवारी रोजी हे दोघे गुनगुनला घेऊन मंत्री जाट यांना भेटण्यासाठी भीलवाडा येथील सर्किट हाऊसमध्ये गेले. मात्र त्या दिवशी मंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती जोधपूर पोलीस आयुक्तलयाचे माजी उपायुक्त भूषण यादव यांनी दिली. हनीट्रॅपच्या प्लानमध्ये मदत करायला गुनगुन सतत अक्षत आणि दिपाली यांना नकार देत होती. मात्र ते दोघे हे काम करण्यासाठी तिचा छळ करीत होते. याच कारणामुळे गुनगुनने जोधपूरमधील हॉटेस लॉर्ज इन मधून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर मथुरा दास माथुर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

आरोपींनी गुनगुनचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवले होते

गुनगुन उपाध्याय ही अक्षत शर्माकडे जयपूरमध्ये काही काळ मॉडेलिंगचे काम करत होती. या दरम्यान आरोपींनी गुनगुनचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवले होते. या व्हिडिओच्या आधारे ते तिला ब्लॅकमेल करत होते. गुनगुनची तब्येत बिघडल्याने ती नोव्हेंबरमध्येच जोधपूरला आपल्या घरी परत आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात दिपालीने गुनगुनला परत आली नाहीस तर आमच्याकडे तुझे न्यूड फोटो आणि व्हिडिओ आहेत ते व्हायरल करु अशी धमकी देऊ लागले. अखेर 20 जानेवारी रोजी गुनगुन त्यांच्याकडे परतली. त्यानंतर 28 जानेवारी रोजी तिला भीलवाडा येथे मंत्री जाट यांच्याकडे आणण्यात आले. मंत्र्यांची भेट न झाल्याने 30 जानेवारी गुनगुन जोधपूरला आली. मात्र जोधपूरमध्ये येऊन तिने घरी न जाता हॉटेल लॉर्ड इन गाठले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुनगुनच्या भावाने अक्षतविरोधात रतनदाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी मास्टरमाईंड अक्षत शर्मासह अन्य दोन मुलींना अटक केली आहे. अक्षतला याआधीही जयपूरमधील एका डॉक्टरला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. (Plan to trap Rajasthan’s revenue minister in honeytrap, Model’s suicide attempt)

इतर बातम्या

Pune Crime | पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीनं अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेसोबत केलं असं की … , पोलिसांनी केली अटक

दादा मला एक ‘पल्सर’ आण, एकुलत्या एक बहिणीची इच्छा, भावाचा बाईक चोरीचा सपाटा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.