पंतप्रधान मोदींची इटलीमध्ये EU च्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न, G20 शिखर परिषदेत अनेक द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा

शिखर परिषदेत ते इतर नेत्यांशी कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्राला पुन्हा रुळावर आणणे, शाश्वत विकास आणि हवामान बदल यावर चर्चा करतील.

पंतप्रधान मोदींची इटलीमध्ये EU च्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न, G20 शिखर परिषदेत अनेक द्विपक्षीय चर्चा होण्याची अपेक्षा
पंतप्रधान मोदींची इटलीमध्ये EU च्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक संपन्न
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 9:27 PM

PM Narendra Modi G20 Summit : G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीची राजधानी रोम येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युरोपियन युनियनच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन उपस्थित होते. त्यांनी पृथ्वीला सर्वोत्तम बनवण्याच्या उद्देशाने आर्थिक आणि लोकांमधील परस्पर संबंध मजबूत करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला पोहोचले आहेत. या परिषदेत ते अनेक द्विपक्षीय चर्चाही करतील अशी अपेक्षा आहे. (PM Modi holds meeting with EU leaders in Italy)

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येथे आल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिली अधिकृत बैठक आहे. शिखर परिषदेत ते इतर नेत्यांशी कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्राला पुन्हा रुळावर आणणे, शाश्वत विकास आणि हवामान बदल यावर चर्चा करतील. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, ‘यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेने रोममध्ये अधिकृत कार्यक्रम सुरू झाले. नेत्यांनी पृथ्वीला सर्वोत्तम बनवण्याच्या उद्देशाने आर्थिक आणि लोकांमधील परस्पर संबंध मजबूत करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.’

भारत आणि युरोपियन युनियनमधील संबंध कसे आहेत?

भारत आणि युरोपियन युनियनमधील द्विपक्षीय संबंध 1960 च्या दशकाच्या सुरुवातीपासून सुरू आहेत. 1962 मध्ये युरोपियन आर्थिक समुदायासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता. पहिली भारत-EU शिखर परिषद 28 जून 2000 रोजी लिस्बन येथे आयोजित करण्यात आली होती आणि दोघांमधील संबंधांच्या विकासामध्ये (भारत EU संबंध) ऐतिहासिक होती. 2004 मध्ये हेग येथे झालेल्या पाचव्या भारत-EU शिखर परिषदेदरम्यान दोघांमधील संबंध ‘सामरिक भागीदारी’पर्यंत पोहोचले.

इटलीच्या पंतप्रधानांचीही भेट घेणार

पंतप्रधान मोदी गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हणाले होते की, भारतात परतण्यापूर्वी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (PM Modi Italy Visit) यांच्या निमंत्रणावरून ते 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत. यानंतर ते ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणावरून 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी ग्लासगो, यूके येथे मुक्काम करतील. मोदी म्हणाले की “रोममध्ये, मी G20 गटाच्या 16 व्या शिखर परिषदेला उपस्थित राहीन आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा करेन की जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य महामारी, शाश्वत विकास आणि हवामान बदलाच्या परिणामांपासून कसे सावरता येईल.” (PM Modi holds meeting with EU leaders in Italy)

इतर बातम्या

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त, यशस्वी उपचारानंतर चाचणी निगेटीव्ह

जुही चावलाच्या एका चुकीमुळे आर्यनची आजची रात्र तुरुंगात? खरं कारण समोर

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.