‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. (india won the battle against coronavirus we must praise maithili sharan gupta poem)

'अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है'; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा  संवाद!
narendra modi
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 11:17 AM

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून कोरोनाचं संकट आणि त्यातून भारताने केलेल्या कामाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी प्रसिद्ध महाकवी मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेच्या ओळी ऐकवून भारतापुढे असलेल्या संधींचं वर्णन केलं. (india won the battle against coronavirus we must praise maithili sharan gupta poem)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जोरदार भाषण केलं. त्यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाचा उल्लेख करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर मैथिली शरण गुप्त यांची कविता ऐकून देशापुढे असलेल्या संधीकडे लक्ष वेधलं. आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यामुळे देशासाठी काही तरी केलं पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये असायला हवी. संकटाच्या काळात जगाची नजर आपल्याकडेच असते.

‘अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल’ मैथिली शरण गुप्त यांची ही कविता संसतदेत ऐकवली. त्यानंतर ते म्हणाले मैथिली शरण गुप्त आज असते तर त्यांनी हीच कविता वेगळ्या पद्धतीने लिहिली असती. त्यांनी ही कविता कशी लिहिली असती हे आपल्या शब्दात त्यांनी मांडलं. मैथिली शरण गुप्त म्हणाले असते, ‘’अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड“, अशी कविता मोदींनी सभागृहात म्हणताच सदस्यांनी डेस्क वाजवून त्यांचं स्वागत केलं.

मोदींची विरोधकांवर टीका

यावेळी त्यांनी कोरोना संकटावरून विरोधकांवर टीका केली. कोरोना संकट आलं तेव्हा जग भारतासाठी चिंतेत होतं. भारत स्वत:ला या संकटातून सावरेल की नाही, असं जगाला वाटत होतं. भारताने आल्या नागरिकांच्या रक्षणासाठी अज्ञात शत्रूशी लढा दिला. भारताने ही लढाई जिंकली म्हणून आज जगाला भारताचा अभिमान वाटत आहे. भारताने ही लढाई कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधातील लढाई जिंकली नाही. मात्र, तरीही याचं क्रेडीट भारताला जातं, असं मोदी म्हणाले. कोरोना काळात वृद्ध महिलेने झोपडीच्या बाहेर दिवा लावला. तिची खिल्ली उडवली गेली. देशाचं मनोबल खच्चीकरण होईल, अशा गोष्टीत विरोधकांनी गुरफटून जाऊ नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

भारताकडून जगाला व्हॅक्सीनचा पुरवठा

ज्या देशाला तिसऱ्या जगाचा हिस्सा मानलं जातं. त्याच भारताने एका वर्षात दोन व्हॅक्सीन बनवल्या आणि जगाला मदत दिली. जेव्हा कोरोनाच्या विरोधात काहीच औषध नव्हतं. तेव्हा भारताने 150 देशांना भारताने औषधे दिली. आता व्हॅक्सीन आली आहे. भारतच संपूर्ण जगाला व्हॅक्सीन दिली आहे. देशातही केंद्र आणि राज्यांनी एकत्र मिळून कोरोनाविरोधात चांगलं काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (india won the battle against coronavirus we must praise maithili sharan gupta poem)

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi Live : मोदींच्या भाषणात बंगालचा उल्लेख, ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

किडनी रुग्णांनी लक्ष द्या! मोदी सरकारचा ‘राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम’, मोफत होणार उपचार

LIVE | नाणार रिफायनरी समर्थक प्रवीण दरेकरांची भेट घेणार

(india won the battle against coronavirus we must praise maithili sharan gupta poem)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.