AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम मोदी हे चीनच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा अधिक दूरदर्शी, आंतरराष्ट्रीय मीडियातून मोदींचं कौतूक

G20 summit : दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशाच्या लोकांना निमंत्रण देऊन एकत्र आणलं. पंतप्रधान मोदींच्या या पुढाकारामुळे रशिया नंतर इतर देशातील मीडियाने देखील कौतूक केले आहे. त्यांना ग्लोबल लीडर म्हटले आहे.

पीएम मोदी हे चीनच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा अधिक दूरदर्शी, आंतरराष्ट्रीय मीडियातून मोदींचं कौतूक
| Updated on: Sep 14, 2023 | 11:38 PM
Share

मुंबई : G20 शिखर परिषदेच्या यशानंतर भारताची जगभरात चर्चा आहे. आज मोठे मोठे देश भारताच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी दाखवत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इतर देशातील नेत्यांसोबत असलेलं बॉन्डिंग जगाने पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या आठवड्यात झालेल्या शिखर परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. G20 च्या माध्यमातून अनेक देशांना एकत्र आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लंडनच्या वर्तमानपत्रांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतूक केले आहे.

भारत आणि अमेरिकेचे संबंध असो, भारत आणि ब्रिटनचे संबंध असो किंवा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध असो. पंतप्रधान मोदी यांनी या नेत्यांसोबत आता मजबूत संबंध बांधले आहेत. हवामान बदल, जागतिक बँकेची नूतनीकरणाची गरज, संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण, आर्थिक स्थैर्य, युक्रेनमधील युद्ध, यासारख्या जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मजबूत ठोस प्रयत्नांची पहिली पायरी म्हणून दिल्लीतील घोषणेचे जागतिक माध्यमांनी वर्णन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीत या अजेंड्यावर सहमती झाली असली तरी, त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संबंधित सरकारांशी स्पष्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर स्वाक्षरी करणार नाही असे लिहिले.

शी जिनपिंग यांनी भारतात येणे टाळले. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष ही आले नाहीत. पण यांच्याशिवाय भारताने जी२० परिषद यशस्वी करुन दाखवली. त्यांची उणीव कुठेही जाणवली नाही.

नवीन BRICS साठी भारत-चीन एकजुटीचा अभाव हा एक मोठा अडसर असल्याचे दिसते. जी-20 शिखर परिषदेला शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही देशांमधील दरी आणखी वाढली आहे. G20 शिखर परिषदेच्या यशामुळे मोदी या हंगामाच्या शिखर परिषदेचे स्पष्ट विजेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडे शी जिनपिंग यांच्यापेक्षा अधिक दूरदर्शी राजकारणी म्हणून पाहिले जाते, असे लंडनच्या वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.

G20 ने आफ्रिकन युनियनचा समावेश करून त्यांची संख्या वाढवली. जे आता G21 होणार आहे. हा विजय मोदींचा स्पष्ट मुत्सद्दी विजय होता. त्याची ग्लोबल साऊथ चॅम्पियन म्हणून प्रतिमा अधिक झळकली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.